धक्कादायक..! विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात; NCRB च्या अहवालानुसार 2021 मध्ये इतक्या विद्यार्थ्यांनी गमावला होता जीव

एनसीआरबीच्या अहवालानुसार महिला विद्यार्थिनींच्या आत्महत्येचे प्रमाण पाच वर्षांची आकडेवारी ही 43.49 टक्के होती, तर एकूण विद्यार्थ्यांच्या आत्महत्येपैकी पुरुष विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण 56.51 टक्के होते. 2017 मध्ये 4 हजार 711 विद्यार्थिनींनी आत्महत्या केली होती, तर 2021 मध्ये अशा मृत्यूंची संख्या 5 हजार 693 इतकी होती.

धक्कादायक..! विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात; NCRB च्या अहवालानुसार 2021 मध्ये इतक्या विद्यार्थ्यांनी गमावला होता जीव
महादेव कांबळे

|

Sep 01, 2022 | 8:55 AM

मुंबईः नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) (National Crime Records Bureau) ने नुकताच एक नवी आकडेवारी जाहीर केली त्यामध्ये असे दिसून आले आहे की 2021 मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण 4.5 टक्क्यांनी वाढले आहे. 2021 मध्ये 1 हजार 834 विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू (Suicide) झाले आहेत. यानंतर मध्य प्रदेशचा आकडा असून तिथे 1 हजार 308 मृत्यू झाले आहेत. तर तामिळनाडूमध्ये 1 हजार 246 मृत्यू झाले असून एनसीआरबीचा भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या प्रकरणाचा अहवाल हा 2021 असं दर्शवितो की 2020 आणि 2021 मध्ये कोरोनाव्हायरसच्या कार्यकालखंडात आजारादरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचेच चित्र या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 2020 मध्ये 12 हजार 526 विद्यार्थ्यांनी आत्महत्या (Student Suicide) केल्या आहेत. तर 2021 मध्ये ही संख्या 13 हजार 089 झाली आहे. 2017 आणि 2019 या कालावधीत देशातील एकूण आत्महत्यांपैकी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अनुक्रमे 7.40 ते 7.60 टक्के होते. तर 2020 मध्ये ते 8.20 टक्क्यांपर्यंत वाढले आणि 2021 मध्ये मात्र यामध्ये थोडी घसरण झाली आहे. ती अगदी 8 टक्क्यांवर आली आहे मात्र, या अहवालात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

परीक्षेत नापास मुख्य कारण

एनसीआरबीच्या अहवालामध्ये असंही म्हटलं आहे की, 18 वर्षांखालील 10 हजार 732 तरुणांनी आत्महत्येमुळे आपला जीव गमावला होता, त्यापैकी 864 विद्यार्थ्यांनी परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या केली होती. ‘कौटुंबिक समस्या’ हे या वयोगटातील (18 वर्षांखालील) आत्महत्येचे सर्वात मोठे कारण होते. तर 2017 पासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणामध्ये 32.15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2017 मध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची संख्या 9 हजार 905 होती.

पदवीधरांचीही आत्महत्या

एनसीआरबीच्या अहवालानुसार महिला विद्यार्थिनींच्या आत्महत्येच्या प्रमाणाची पाच वर्षातील आकडेवारी ही 43.49 टक्के होती, तर एकूण विद्यार्थ्यांच्या आत्महत्येपैकी पुरुष विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण 56.51 टक्के होते. 2017 मध्ये 4 हजार 711 विद्यार्थिनींनी आत्महत्या केली होती, तर 2021 मध्ये अशा मृत्यूंची संख्या 5 हजार 693 इतकी होती. NCRB च्या अहवालानुसार आत्महत्याग्रस्तांची शैक्षणिक स्थिती देखील दर्शविण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, एकूण आत्महत्याग्रस्तांपैकी फक्त 4.6 टक्के पदवीधर किंवा अधिक शिक्षित होते.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें