भारताचे मिग 21 विमान कोसळलं

जयपूर: भारतीय वायूदलाचं मिग 21 हे विमान राजस्थानमध्ये कोसळलं आहे. बिकानेरमधील शोभासर गावाजवळ मिग 21 हे लढाऊ विमान कोसळलं. नाल हवाईतळाजवळ शोभासर हे गाव आहे. विमान कोसळल्यानंतर पायलट सुरक्षितरित्या बाहेर आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. बिकानेर जिल्हाधिकाऱ्यांनी विमान दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  मिग 21 कोसळल्यानंतर गावकऱ्यांनीही धुराचे लोट पाहिल्याचं नमूद केलं. इतकंच नाही तर गावकऱ्यांनी …

भारताचे मिग 21 विमान कोसळलं

जयपूर: भारतीय वायूदलाचं मिग 21 हे विमान राजस्थानमध्ये कोसळलं आहे. बिकानेरमधील शोभासर गावाजवळ मिग 21 हे लढाऊ विमान कोसळलं. नाल हवाईतळाजवळ शोभासर हे गाव आहे. विमान कोसळल्यानंतर पायलट सुरक्षितरित्या बाहेर आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

बिकानेर जिल्हाधिकाऱ्यांनी विमान दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  मिग 21 कोसळल्यानंतर गावकऱ्यांनीही धुराचे लोट पाहिल्याचं नमूद केलं. इतकंच नाही तर गावकऱ्यांनी दोन पायलट पॅराशूटद्वारे बाहेर आल्याचंही गावकऱ्यांनी पाहिलं.

नाल हवाईतळ हे पश्चिम राजस्थानातील महत्त्वाचं हवाईतळ आहे.

मिग 21 हे भारताचं लढाऊ विमान आहे. या विमानाला सातत्याने अपघात होत असतात. त्यामुळे मिग 21 विमाने वायूदलातून हद्दपार करण्याची मागणी झाली होती.

मिग 21 ही विमाने भारताच्या ताफ्यात 1963 मध्ये आली. मात्र इतकी जुन्या विमानांमध्ये तात्रिंक बिघाड येऊन ही विमानं कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

मिग 21 विरोधात याचिका

दरम्यान, पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानच्या बालाकोटवर हवाई हल्ला केला. त्यादरम्यान वायूदलाचे विंग किमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने पकडले. त्यांची सुटकाही झाली. मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात एका संस्थेने मिग 21 या लढाऊ विमानांच्या वापराला आक्षेप घेत याचिका दाखल केली. मिग 21 या जुन्या विमानांचा अद्याप भारताच्या हवाई दलामध्ये का समावेश आहे, भारतीय वैमानिकांचा जीव धोक्यात का घातला जात आहे, अशी विचारणा या याचिकेमधून करण्यात आली आहे.

वायूसेनेने मिग 21 विमाने हद्दपार करावी, असे निर्देश सरकार आणि वायूसेनेला द्या अशी मागणी याचिकेत केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *