भारतीय जवान आता ‘गायब’ होणार?

नवी दिल्ली : आता भारतीय लष्करासाठी वैज्ञानिकांनी अशा प्रकारचा धातू शोधला आहे, ज्यामुळे जवान अदृश्य होऊ शकतील. आयआयटी कानपूरच्या वैज्ञानिकांनी या धातूचा शोध लावला आहे. वैज्ञानिकांनी मेटा-मटेरियलचा शोध लावल्याचा दावा केला आहे. या धातूचे कपडे परिधा केल्याने भारतीय जवान, त्यांचे टँक, लढाऊ विमान दिसणार नाहीत. त्यामुळे शत्रूंचा खात्मा करणे सोपे होईल, तसेच यामुळे शत्रूंना आपल्यापर्यंत पोहोचण्यापासून …

Indian Institute of Technology-Kanpur, भारतीय जवान आता ‘गायब’ होणार?

नवी दिल्ली : आता भारतीय लष्करासाठी वैज्ञानिकांनी अशा प्रकारचा धातू शोधला आहे, ज्यामुळे जवान अदृश्य होऊ शकतील. आयआयटी कानपूरच्या वैज्ञानिकांनी या धातूचा शोध लावला आहे. वैज्ञानिकांनी मेटा-मटेरियलचा शोध लावल्याचा दावा केला आहे. या धातूचे कपडे परिधा केल्याने भारतीय जवान, त्यांचे टँक, लढाऊ विमान दिसणार नाहीत. त्यामुळे शत्रूंचा खात्मा करणे सोपे होईल, तसेच यामुळे शत्रूंना आपल्यापर्यंत पोहोचण्यापासून देखील रोखता येईल.
भारतीय जवान हे कठीण परिस्थितही देशाचे रक्षण करण्यासाठी नेहमी तयार असतात. अगदी गोठवणारी थंडी असली तरी आपले जवान शत्रूंपासून देशाचे रक्षण करतात. शत्रूंना उत्तर देत असताना देशाची संपत्ती आणि अनेक लढाऊ सामग्रीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. हे नुकसान होऊ नये यासाठी वैज्ञानिकांनी हा शोध लावला आहे. यामुळे भारतीय जवान, त्यांचे शस्त्र आणि रणगाडे दिसणार नाहीत. आयआयटी कानपूरच्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाचे कुमार वैभव श्रीवास्तव आणि मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागाचे जे रामकुमार यांनी हा शोध लावला.
हा शोध लावण्याची आयडिया 1987 मध्ये आलेला अनिल कपूर आणि श्रीदेवीचा सुपरहिट चित्रपट ‘मिस्टर इंडिया’वरुन आला, असे वैज्ञानिक सांगतात. या चित्रपटात एक खास घड्याळ दाखवण्यात आलं आहे, जे घातल्यावर माणूस अदृश्य होतो.
मेटामटेरियल कशाप्रकारे काम करतं?
अंधारात व्यक्ती किंवा वस्तू हिट रेडिएशनमुळे शरीराच्या तापमानाने व्यक्तीचं अस्तित्व दिसून येते. रडारचे तरंग विमानाला धडकल्याने त्याचे संकेत देखील मिळतात. पण मेटामटेरियल हे एखाद्या आवरणासारखं काम करणार.
मेटामटेरियल हा प्लास्टिक सारख्या तंतूंपासून बनलेला एक धातू आहे. विद्युत चुंबकीय तरंगांमध्ये फेर करण्यासाठी मेटामटेरियल आवरणाचं काम करेल. या धातूचे कपडे घातल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आरएफ सेंसर, ग्राउंड रडार, एडव्हांस बॅटल फील्ड रडार आणि इंफ्रारेड कॅमेरे तुम्हाला शोधू शकणार नाही.
वैज्ञानिकांनी शोधलेल्या या धातूचे वस्त्र जवानांनी घातले तर ते मिस्टर इंडिया सारखे अदृश्य तर नाही होणार. मात्र रात्रीच्या वेळी ते शत्रूच्या कॅमेऱ्यात दिसण्यापासून वाचू शकतील, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. आयआयटी कानपूर डीआरडीओने याचे लॅब परीक्षण पूर्ण केले असून सध्या याचे फिल्ड परीक्षण सुरु आहे. जर हा धातू खरंच भारतीय लष्कराला मिळाला तर आपले लष्कर आणखी मजबूत होईल, तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही हे महत्वाचे ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *