वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत इंदिरा नुई

वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत इंदिरा नुई

नवी दिल्ली : वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या पेप्सिकोच्या माजी सीईओ इंदिरा नुई यांच्याही नावाचा समावेश झाला आहे. द न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदासाठी व्हाईट हाऊसकडून इंदिरा नुईंच्या नावाचा विचार सुरु आहे. नुकतेच वर्ल्ड बँकचे सध्याचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी फेब्रुवारीमध्ये मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयानंतर नवीन अध्यक्ष शोधण्याच्या हालचालींना सुरु झाल्यात आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्या पसंतीनुसार इंदिरा नुई यांच्या नावाचा समावेश या अध्यक्षपदासाठी करण्यात येत आहे. इंदिरा नुई या इवांका ट्रम्प यांची पसंती इंदिरा नुई यांना आहे. वर्ल्ड बँकेचं अध्यक्ष  निवडण्यासाठी इवांका महत्त्वाची भूमिका निभावत आहे. मात्र अजूनपर्यंत नुई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही.

कोण आहेत इंदिरा नुई?

चेन्नईमध्ये जन्मलेल्या 63 वर्षाच्या इंदिरा नुई यांना जगातील शक्तिशाली आणि यशस्वी महिलां म्हणून ओळखलं जातं. अनेक कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर इंदिरा यांनी 1994 मध्ये पेप्सिको कंपनी जॉईन केली. तर 2006 मध्ये इंदिरा नुई यांच्या कामगिरीमुळे कंपनीच्या शेअरमध्ये 78 टक्क्यांनी वाढ झाली. त्यांनी 12 वर्षे पेप्सिकोचं काम सांभाळल्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये पेप्सिको कंपनीच्या पदाचा राजीनामा दिला. तसेच फोर्ब्स मॅगझीनमध्ये जगातील शंभर यशस्वी महिलांच्या यादीत नुई यांच्या नावाचा बऱ्याचदा समावेश झाला आहे. तर 2017 मध्ये नुई फोर्ब्सच्या यादीत 11 व्या क्रमांकावर होत्या. विशेष म्हणजे 2007 ला त्यांना भारतातील प्रतिष्ठित अशा पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

इवांका यांच्या नावाची सुद्धा चर्चा?

वर्ल्ड बँकच्या अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्याही नावाची चर्चा सुरु होती. मात्र, मागच्या सोमवारी व्हाईट हाऊसने या वृत्ताला पूर्णविराम देत सांगितले की, इवांका अमेरिकन नामांकनाच्या प्रक्रियेत मदत करतील. कारण त्यांनी गेल्या दोन वर्षात वर्ल्ड बँकच्या नेतृत्वात महत्त्वाची कामगिरी केली आहे.

वर्ल्ड बँकच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेची भूमिका खूप महत्त्वाची आहे. वर्ल्ड बँकेमध्ये सर्वात जास्त शेअरचा वाटा अमेरिकेचा असल्यामुळे अमेरिका अध्यक्षपदाची नियुक्ती करते. वर्ल्ड बँकेचे मावळते अध्यक्ष जिम योंग किम यांची निवड 2012 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नियुक्त केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *