नेहरु ते मोदी, अर्थसंकल्पाबाबतच्या या 9 गोष्टी माहित आहेत का?

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना संबोधित केलं. 13 फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अनुपस्थितीमध्ये प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल अर्थसंकल्प सादर करतील. पियुष गोयल यांच्याकडेच रेल्वे मंत्रालयही आहे. मोदी सरकारने सत्तेत येताच अर्थसंकल्पामध्ये काही बदल केले. मार्चमध्ये सादर केला जाणारा …

नेहरु ते मोदी, अर्थसंकल्पाबाबतच्या या 9 गोष्टी माहित आहेत का?

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना संबोधित केलं. 13 फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अनुपस्थितीमध्ये प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल अर्थसंकल्प सादर करतील. पियुष गोयल यांच्याकडेच रेल्वे मंत्रालयही आहे.

मोदी सरकारने सत्तेत येताच अर्थसंकल्पामध्ये काही बदल केले. मार्चमध्ये सादर केला जाणारा अर्थसंकल्प आता फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी सादर केला जातो, जेणेकरुन 1 मार्चपासूनच नव्या निधीची वाटप करता येईल. शिवाय रेल्वेचा अर्थसंकल्पही मुख्य अर्थसंकल्पामध्येच विलिन करण्यात आला. पण हे काही पहिलेच बदल नाहीत. स्वातंत्र्यानंतर अर्थसंकल्पाला मोठा इतिहास आहे आणि याविषयी अनेक रंजक गोष्टीही आहेत.

  1. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी तत्कालीन अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता. 15 ऑगस्ट 1947 ते 31 मार्च 1948 या काळासाठी हा अर्थसंकल्प होता.
  2. सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला. काँग्रेसच्या काळात अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी 9 वेळा, तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री म्हणून 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला.
  3. मोरारजी देसाई यांच्या नावावर आणखी एक विक्रम आहे. जन्मदिनाच्या दिवशी अर्थसंकल्प मांडणारे ते पहिलेच अर्थमंत्री आहेत. 29 फेब्रुवारी 1964 रोज हा अर्थसंकल्प सादर केला होता.
  4. इंदिरा गांधी या एकमेव महिला अर्थमंत्री होऊन गेल्या. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अर्थमंत्री असलेल्या मोरारजी देसाईंनी अचानक राजीनामा दिला. यानंतर अर्थमंत्रालयाचा कार्यभार इंदिरा गांधींनी सांभाळला.
  5. अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांची छपाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्प सादर होण्याच्या दहा दिवस अगोदर गोपनीय ठिकाणी ठेवलं जातं. त्यांनी कुठेही जाण्याची परवानगी नसते. हलवा सेरेमनीने या छपाईची सुरुवात होते. अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा हलवा वाटला जातो. या कार्यक्रमात अर्थमंत्रीही सहभागी असतात, पण यावेळी अरुण जेटली आजारी असल्यामुळे ते सहभागी होऊ शकले नाही.
  6. पंतप्रधान असताना राजीव गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. राजीव गांधी पंतप्रधान असताना व्ही. पी. सिंह हे अर्थमंत्री होते, पण त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राजीव गांधींनी अर्थसंकल्प सादर केला. राजीव गांधींनी साल 1987-88 चा अर्थसंकल्प सादर केला होता.
  7. इंद्र कुमार गुजराल पंतप्रधान असताना 1997-98 चा अर्थसंकल्प कोणत्याही चर्चेविना मंजूर करुन घेण्यात आला होता. यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं.
  8. तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 1997-98 साली जो अर्थसंकल्प सादर केला, त्याला ड्रीम बजेट असंही म्हणतात. कारण, यामध्ये अनेक आर्थिक सुधारणांचा समावेश होता. आयकरात कपात, कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात यासह अनेक बदल केले होते.
  9. 1999 पूर्वी अर्थसंकल्प सायंकाळी 5 वाजल्यानंतर सादर केला जायचा. पण 1999 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी वेळेत बदल करत सकाळी 11 ची वेळ केली. आता सकाळी 11 वाजता अर्थमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात होते.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *