IRCTC Child Ticket Policy: लहान मुलांच्या तिकिटाचा तो नियम, पालकांना माहितीची नाही, प्रवासाअगोदर जाणून घ्या
IRCTC Child Ticket Policy: रेल्वेचा प्रवास अनेकांसाठी खास असतो. अगदी आरामशीर, रमत गमत सोयी-सुविधांसह दूरचा प्रवास करता येतो. अगोदर बुकिंग केलं असेल तर रेल्वेचा प्रवास सुखकर होतो. पण लहान मुलांच्या तिकीटाचा हा नियम माहिती आहे का? प्रवासापूर्वी जाणून घ्या.

Child Ticket Policy: भारतीय रेल्वेने ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या सुट्ट्यांसाठी तिकीट बुकिंग सुरु केले आहे. अनेक प्रवासी त्यांच्या मुलांसोबत देशभरातील लोकप्रिय, प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देणार आहे. या पर्यटन स्थळाजवळील रेल्वे स्टेशनची माहिती घेऊन अनेकांनी तिकीट बुकिंग सुरु केली आहे. या काळात अनेक शाळांना सुट्ट्या राहत असल्याने अनेकांनी प्रवासाचा बेत आखला आहे. लहान मुलं रेल्वेने प्रवास करण्यासाठी उत्साहित झाले आहेत. त्यांना मोठ्या काचेतून बाहेरील दृश्य पाहायचे आहेत. तर काहींना दूरच्या प्रदेश आणि तिथले बगीचे पाहायचे आहेत. पण लहान मुलांच्या रेल्वे तिकीटाचा हा नियम माहिती आहे का? अपडेट जाणून घ्या.
भारतीय रेल्वेचे लहान मुलांसाठीचे तिकीट धोरण
भारतीय रेल्वेचे लहान मुलांसाठी तिकीट धोरण आहे. त्याची माहिती पालकांना असणं आवश्यक आहे. नाहीतर तिकीट बुकिंग करताना वेळेवर गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या नियमानुसार, पाच वर्षांच्या आतील मुलं रेल्वेने मोफत प्रवास करू शकतात. त्यांना कोणतेही तिकीट लागत नाही. पण त्याविषयीचा पुरावा मागितला तर तो सादर करावा लागतो. प्रवासाचा बेत आखण्यापूर्वी पालकांनी या नियमांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
मुलांसाठी भारतीय रेल्वे भाडे नियम, IRCTC लहान मुलांचे तिकीट
खालील वयोगटानुसार भारतीय रेल्वे लहान मुलांसाठी भाडे आकारते.
भारतीय रेल्वे बालक तिकीट वयानुसार मर्यादा
5 वर्षांपेक्षा कमी
मोफत प्रवास (वेगळा तिकीट आवश्यक नाही)
5 ते 12 वर्षांपेक्षा कमी
तिकीट/सीट आवश्यक नाही? लहान मुलांचे भाडे द्यावे लागेल वेगळा तिकीट/सीट हवे आहे? प्रौढांसाठीचे भाडे आकारण्यात येईल
12 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाची मुलं
या वर्गासाठी प्रौढाप्रमाणे भाडे आकारण्यात येईल
परिपत्रकातील माहिती काय?
लहान मुलांसाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाने 6 मार्च 2020 रोजी एक परिपत्रक काढले. त्यानुसार, 5 वर्षांआतील मुलांसाठी कोणतेही भाडे घेतले जाणार नाही. या मुलांसाठी रेल्वेचा प्रवास मोफत असेल. पण त्यांना या प्रवासात वेगळे सीट देण्यात येणार नाही. पालकांना त्यांना मांडीवर न्यावे लागेल. त्यांना सीट, आसन दिले नसल्याने त्यांच्याकडून तिकीटाचा दर आकारण्यात येत नाही. पण जर 5 वर्षांच्या आतील मुलांना स्वतंत्र आसन, सीट हवं असेल तर अशा मुलांसाठी ऐच्छिक आधारावर प्रौढांसाठीचा तिकीट दर द्यावा लागेल. त्यामुळे जर तुम्ही दीर्घ प्रवासात असाल तर लहान मुलांसाठी आसन व्यवस्थेचा निर्णय पालकांना घेता येतो. त्यासाठी मात्र त्यांना तिकीट घ्यावे लागेल.
