IRCTC ने नियम बदलले! तिकीट बुकिंग करण्यासाठी आता नवे नियम, जाणून घ्या…

विशेष म्हणजे रेल्वे मंत्रालयानं नागरिकांच्या सुविधेसाठी कोरोना काळातही अनेक ट्रेन सोडल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची खबरदारीसुद्धा घेतली जात आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:55 PM, 6 Nov 2020

नवी दिल्लीः गेल्या काही महिन्यांपासून देशावर कोरोनाचं संकट आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. पण आता देश पुन्हा एकदा अनलॉक झालेला असून, हळूहळू जनजीवन रुळावर येत आहे. विशेष म्हणजे रेल्वे मंत्रालयानं नागरिकांच्या सुविधेसाठी कोरोना काळातही अनेक ट्रेन सोडल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची खबरदारीसुद्धा घेतली जात आहे. इंडियन रेल्वे कॅटेरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम लागू केला आहे. कोरोनाच्या संकटामुळे IRCTC नियमांमध्ये काही बदल केले आहेत.(IRCTC Introduces New Rules)

IRCTC ने आता निर्णय घेतला आहे की, दुसरा रिझर्व्हेशन चार्ट ट्रेनच्या सुटण्याच्या 30 मिनिटे आधी तयार केला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून, कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे, ट्रेनमध्ये बर्थ बुक केलेल्या प्रवाशांना सूचित करण्यासाठी दुसरा चार्ट दोन तासांपूर्वी तयार केला जात होता. कोरोना संकटाच्या पूर्वी IRCTC रेल्वे सुटण्यापूर्वी चार तास आधी पहिला चार्ट प्रसिद्ध करीत होती. पण आता उर्वरित जागांच्या बुकिंगसाठी, प्रवासी आरक्षण सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वीच प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) काउंटरकडे जाऊ शकणार आहे. दुसरा आरक्षण तक्ता तयार होण्यापूर्वी ते आसन ऑनलाईन बुक करू शकता येणार आहे. प्रथम बुक करणाऱ्याला प्राधान्य दिलं जाणार असून, त्याआधारे जागा वाटप करण्यात येणार आहे.

विभागीय रेल्वेने विनंती केली की, गाड्या सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी दुसरा आरक्षण चार्ट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हे केले गेले आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे सुटण्यापूर्वी 30 मिनिटे ते 5 मिनिटांपूर्वी दुसरे आरक्षण चार्ट तयार करण्यात येणार आहे. परताव्याच्या तरतुदीनुसार या कालावधीत आरक्षित तिकिटे रद्द करण्याची परवानगी होती. यामुळे ट्रेनमधून प्रवास करणा-या प्रवाशांना दिलासा मिळाला, कारण शेवटच्या क्षणी योजना बदलल्यासही ते तिकीट रद्द करू शकतात आणि परतावा मिळवू शकतात.

10 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमधील नवीन तरतुदी पूर्ववत करण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे माहिती प्रणालीत (CRIS) आवश्यक बदल केले आहेत, असे रेल्वे मंत्रालयाने सांगितले. आयआरसीटीसी ई-बुकिंगचे नियम कायम राहिले आहेत. रेल्वे अधिका-याच्या म्हणण्यानुसार प्रवाशांनी रेल्वे सुटण्यापूर्वी एक-दोन तास आधी रेल्वे स्टेशनवर पोहोचणे अपेक्षित आहे.

रेल्वे तिकिटांच्या ऑनलाइन बुकिंगला अधिक सोपं करण्यासाठी भारतीय रेल्वे खात्याने अनेक महत्त्वाचे बदल (New Facilities of IRCTC for Passenger) केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक सुविधांचा उपयोग घेता येणार आहे. रेल्वेची अधिकृत वेबसाईट इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिजम कॉर्पोरेशनने (IRCTC) नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत वेबसाईटला अधिक यूजर फ्रेंडली केलं आहे. सोपं डिझाईन आणि नवे फीचर्समुळे आता वेबसाईटवर (www.irctc.co.in) सहजपणे ‘ट्रेन तिकिट’ उपलब्धतेचा पर्याय देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी यूजर्सला वेबसाईटवर लॉगिन करण्याची आवश्यकता नाही.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीला तिकीट बुकिंग करण्यापूर्वीच Aadhaarला IRCTC खात्याशी करा लिंक; जबरदस्त फायदे

रेल्वेची बडी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, SEBI कडे कागदपत्रे जमा