1 सप्टेंबरपासून रेल्वेचं ऑनलाईन तिकीट महागणार

आयआरसीटीसीने ऑनलाईन तिकीट काढणे महागणार आहे (IRCTC Railway Ticketing) . रेल्वेच्या आदेशानुसार, 1 सप्टेंबर 2019 पासून सेवा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

1 सप्टेंबरपासून रेल्वेचं ऑनलाईन तिकीट महागणार

मुंबई : भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम लिमिटेडच्या (आयआरसीटीसी) सुविधेमुळे तिकीट खिडकीवर न जाता घरबसल्या डिजीटल तिकीट काढणे सोपं झालं होतं. मात्र, आता आयआरसीटीसीने ऑनलाईन तिकीट काढणे महागणार आहे (IRCTC Railway e-Ticketing) . रेल्वेच्या आदेशानुसार, 1 सप्टेंबर 2019 पासून सेवा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयआरसीटीसीकडून 30 ऑगस्टला हा आदेश जारी करण्यात आला. यानुसार, आता आयआरसीटीसी स्लीपरच्या ऑनलाईन तिकीटवर 15 रुपये आणि एसीच्या सर्व वर्गातील ऑनलाईन तिकिटांवर 30 रुपये इतका सेवा शुल्क आकारला जाईल. तर, वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीचा यामध्ये समावेश नसेल.

तीन वर्षांपूर्वी भाजपच्या नोतृत्त्वातील मोदी सरकारने डिजीटल व्यवहार वाढवण्यासाठी रेल्वे तिकिटांवर लावण्यात येणारा सेवा शुल्क काढला होता. त्यावेळी आयआरसीटीसीकडून स्लीपरच्या ऑनलाईन तिकीटवर 20 रुपये आणि एसीच्या सर्व वर्गातील ऑनलाईन तिकिटांवर 40 रुपये इतका सेवा शुल्क आकारला जायचा.

याच महिन्याच्या सुरुवातीला रेल्वेने आयआरसीटीसीला ऑनलाईन तिकिटांवर प्रवाशांकडून सेवा शुल्क आकारण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे आता आयआरसीटीसीच्या अॅप्लिकेशनने घरबसल्या तिकीट काढणे महागणार आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *