IRCTC IPO च्या भरघोस कमाईनंतर रेल्वे आणतोय आणखी एक IPO; कमाई करण्याची उत्तम संधी

गुंतवणूकदार बराच काळ या आयपीओची वाट पाहत होते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:36 PM, 13 Jan 2021
IRFC Ipo

नवी दिल्लीः वर्ष 2020 आयपीओसाठी जबरदस्त राहिलंय. यंदा आयपीओ बाजारही मजबूत राहण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात भारतीय रेल्वेच्या फायनान्स कंपनीपासून होत आहे. IRCTC च्या भरघोस यशानंतर रेल्वेने आपली भारतीय कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC IPO) साठी आयपीओ जारी करण्याची घोषणा केलीय. गुंतवणूकदार बराच काळ या आयपीओची वाट पाहत होते. (IRFC Ipo Date Price And Subscription Details Know Everything)

आयआरएफसीचा आयपीओ 18 जानेवारी रोजी उघडणार आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (DIPAM) सचिव तुहिन कांत पांडे यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यांनी ट्विट केले की, ‘IRFC IPO 4600 कोटी रुपयांचा असेल. यासाठी किंमत बँड 25 ते 26 रुपये ठेवण्यात आलीय. ‘रेल्वेच्या नॉन-बँकिंग फायनान्शल कंपनीचा (NBFC) हा पहिला आयपीओ असेल. आयपीओ 20 जानेवारी रोजी बंद होईल.

178 कोटी समभाग जारी केले जाणार

जानेवारी 2020 मध्ये IRFC ने आयपीओसाठी कागदपत्रे सादर केली. हा आयपीओ 178.20 कोटी शेअर्सचा असेल. या अंतर्गत 118.80 कोटी नवीन शेअर्स जारी केले जातील. त्याचबरोबर सरकार 59.40 कोटी शेअर्सची विक्री ऑफर आणेल. आयआरएफसीची स्थापना 1986 मध्ये झाली होती. कंपनीचा प्रमुख व्यवसाय म्हणजे वित्तीय बाजारपेठेतून निधी गोळा करणे आणि मालमत्ता संपादन करणे किंवा तयार करणे यासाठी वित्तपुरवठा करणे. या मालमत्ता नंतर भारतीय रेल्वेला भाड्याने दिल्या आहेत.

2017 मध्ये पाच कंपन्यांचे आयपीओ मंजूर

केंद्रीय मंत्रिमंडळाने एप्रिल 2017 मध्ये पाच रेल्वे कंपन्यांच्या यादीस मान्यता दिली होती. यापैकी चार कंपन्या आयआरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, राइट्स लिमिटेड, रेल विकास निगम लिमिटेड आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यापूर्वीच याद्या सूचीबद्ध झाल्या आहेत.

IRCTC वार्षिक आधारावर 56% परतावा देते

IRCTC ने वार्षिक आधारावर 56 टक्के परतावा दिला असून, त्याची बाजारपेठ 23 हजार कोटींवर गेलीय. रेल्वे विकास निगम लिमिटेडने वार्षिक आधारावर 30 टक्के परतावा दिलाय. आयआरकॉन इंटरनॅशनलने वार्षिक 6% परतावा दिलाय. रिट्स लिमिटेडने वार्षिक आधारावर 14% नकारात्मक परतावा दिलाय.

संबंधित बातम्या

मुंबई हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट ट्रेन दररोज धावणार, रेल्वे मंत्र्यांचं ट्विट

Petrol And Diesel Price | पेट्रोलचे दर 91 रुपयांच्या पार, डिझेलही महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

IRFC Ipo Date Price And Subscription Details Know Everything