नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन म्हणतात, जय श्री रामच्या घोषणा केवळ मारहाणीसाठी!

जय श्रीराम या घोषणेचा बंगालच्या संस्कृतीशी काहीही संबंध नाही. केवळ लोकांना मारहाण करण्यासाठी जय श्रीरामचे नारे देण्यात येत आहेत, असं अमर्त्य सेन म्हणाले.

नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन म्हणतात, जय श्री रामच्या घोषणा केवळ मारहाणीसाठी!
Follow us
| Updated on: Jul 06, 2019 | 11:32 AM

कोलकाता: नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ यांनी  जय श्रीरामच्या घोषणावरुन उठललेल्या वादंगावर भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. त्याबाबत अमर्त्य सेन यांनी जय श्री रामचा नारा ही बंगाली संस्कृती नाही असं म्हटलं आहे. अमर्त्य सेन यांनी जाधवपूर विद्यापीठातील एका कार्यक्रमात संबोधित केलं. त्यावेळी अमर्त्य सेन यांनी देशातील सध्याच्या घडामोडींवर भाष्य केलं.

जय श्रीराम या घोषणेचा बंगालच्या संस्कृतीशी काहीही संबंध नाही. केवळ लोकांना मारहाण करण्यासाठी जय श्रीरामचे नारे देण्यात येत आहेत, असं अमर्त्य सेन म्हणाले.

“दुर्गा माता बंगाली नागरिकांच्या जीवनात सर्वत्र आहे. बंगालमध्ये दुर्गेची पूजा होते. जय श्री रामची घोषणा बंगाली संस्कृती नाही. मात्र आजकाल राम नवमी लोकप्रियता मिळवत आहे”, असंही सेन यांनी नमूद केलं.

मी माझ्या चार वर्षाच्या नातीला तुझा आवडता देव कोणता हे विचारलं. त्यावर तिने दुर्गा मातेचं नाव घेतलं. त्यामुळे आपल्या आयुष्यात दुर्गामातेचं स्थान आहे. मला वाटतं जय श्रीरामचे नारे केवळ लोकांना मारहाण करण्यासाठी वापरले जात आहेत, असं अमर्त्य सेन यांनी सांगितलं.

कोण आहेत अमर्त्य सेन?

  • अमर्त्य सेन हे भारताचे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ आहेत.
  • भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ अशी त्यांची ओळख आहे.
  • बंगाली भाषिक असलेल्या अमर्त्य सेन यांना 1999 मध्ये ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आलं आहे.
  • ‘कल्याणाभिमुख अर्थशास्त्र’ आणि ‘सामाजिक पर्याय सिद्धांत’ या विषयातील कार्यासाठी 1998 मध्ये त्यांना अर्थशास्त्रातलं ‘नोबेल’ पारितोषिक मिळालं.
  • अमर्त्य सेन यांचं शिक्षण कोलकात्यातील शांतिनिकेतन आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पूर्ण झालं. त्यानंतर पुढील शिक्षण केंब्रिजच्या ट्रिनिटी विद्यापीठात घेतलं.
  • भारत सरकारच्या नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी 2007 मध्ये बनवलेल्या ‘नालंदा मार्गदर्शक समूहा’चे ते अध्यक्ष आहेत.
  • अमर्त्य सेन यांनी भारतासह परदेशी विद्यापीठांमध्ये लेक्चर्स दिली आहेत.
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.