पुन्हा ‘पुलवामा’चा प्रयत्न, CRPF च्या बसला स्फोटकांची कार धडकली

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू महामार्गावर पुलवामासारखा हल्ला होता होता राहिला. स्फोटकाने भरलेल्या एका कारने सीआरपीएफच्या बसला मागून धडक दिली. मात्र सुदैवाने ही बस पुढे निघून गेली आणि त्या कारमध्येच हा स्फोट झाल्याने मोठी जीवितहानी टळली. या स्फोटात कारचा चक्काचूर झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सीआरपीएफच्या 6-7 बसचा ताफा निघाला होता. त्यामध्ये जवळपास 40 जवान […]

पुन्हा 'पुलवामा'चा प्रयत्न, CRPF च्या बसला स्फोटकांची कार धडकली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू महामार्गावर पुलवामासारखा हल्ला होता होता राहिला. स्फोटकाने भरलेल्या एका कारने सीआरपीएफच्या बसला मागून धडक दिली. मात्र सुदैवाने ही बस पुढे निघून गेली आणि त्या कारमध्येच हा स्फोट झाल्याने मोठी जीवितहानी टळली. या स्फोटात कारचा चक्काचूर झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सीआरपीएफच्या 6-7 बसचा ताफा निघाला होता. त्यामध्ये जवळपास 40 जवान होते. मात्र सुदैवाने कोणत्याही जवानाला दुखापत झाली नाही.

भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी काही दिवसांपूर्वीच पुलवामा हल्ल्यासारखी घटना घडू शकते, असा अलर्ट दिला होता.

दरम्यान, आजचा स्फोट बनिहाल बोगद्याजवळ झाला. एक सँट्रो कार महामार्गावर उभी होती. सीआरपीएफचा ताफा जवळ येताच, या कारमध्ये स्फोट झाला. या कारमध्ये कोणीही नव्हतं. कारचालक फरार झाल्याने सुरक्षा संस्थांची शंका आणखी अधोरेखित झाली. सध्या या कारचालकाचा शोध सुरु आहे.

सुरुवातीला हा कारमधील सिलेंडर स्फोट असावा अशी सर्वांची धारणा झाली. कारचं छत हवेत उडालं. मात्र त्याचवेळी ड्रायव्हर गायब झाला. सीआरपीएफचा ताफा या कारपासून लांब होता. मात्र हा स्फोट इतका भीषण होता की, लांबवर असूनही सीआरपीएफच्या एका बसला किरकोळ नुकसान झालं. सध्या सुरक्षा रक्षकांनी या परिसराची घेराबंदी केली असून कसून तपास सुरु आहे.

पुलवामा हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं 14 फेब्रुवारीला भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने घेतली होती.

14 फेब्रुवारीला श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी हायवेवर गाडीमध्ये आयईडी (Improvised Explosive Device) स्फोटकं भरुन त्यात हा स्फोट घडवून आणला. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आला होता. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.

संबंधित बातम्या 

दोन-तीन महिन्यात पुन्हा पुलवामासारखा हल्ला: राज ठाकरे 

पुलवामातील बलिदान ना विसरलो, ना विसरणार : अजित डोभाल 

ऑपरेशन थंडरबोल्ट : घरात घुसून मारणं याला म्हणतात!   

पाकिस्तानी विमानांचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न, वायूसेना हायअलर्टवर 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.