आईचा शब्द पाळला, दशहतवाद्याला जिवंत पकडलं

नवी दिल्ली : सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवादी बनलेल्या एका तरूणाच्या आईला दिलेलं आश्वासन निभावण्यासाठी त्याला जिवंत पकडले. सोहेल नावाचा तरुण चार महिन्यांपूर्वी जैश-ए-मोहम्मदमध्ये सहभागी झाला. जेव्हा लष्कराचे अधिकारी त्याच्या घरी चौकशी करायला गेले तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याच्या आईला आश्वासन दिले की ते सोहेलचे एनकाऊंटर करणार नाहीत. लष्कराने आपले आश्वासन पूर्ण केले. सोहेलने त्यांच्यावर गोळीबार केला तरीही जवानांनी …

Jammu-Kashmir Indian Army, आईचा शब्द पाळला, दशहतवाद्याला जिवंत पकडलं

नवी दिल्ली : सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवादी बनलेल्या एका तरूणाच्या आईला दिलेलं आश्वासन निभावण्यासाठी त्याला जिवंत पकडले. सोहेल नावाचा तरुण चार महिन्यांपूर्वी जैश-ए-मोहम्मदमध्ये सहभागी झाला. जेव्हा लष्कराचे अधिकारी त्याच्या घरी चौकशी करायला गेले तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याच्या आईला आश्वासन दिले की ते सोहेलचे एनकाऊंटर करणार नाहीत. लष्कराने आपले आश्वासन पूर्ण केले. सोहेलने त्यांच्यावर गोळीबार केला तरीही जवानांनी त्याच्यावर गोळ्या चालवल्या नाहीत, शिवाय त्याला जिवंत पकडलं.

लेफ्टनंट कर्नल एस राघव यांनी सांगितले की,

“काश्मीरच्या कुरू येथील रहिवासी सोहाल निसार लोन ‘सी’ कॅटेगरीचा दहशतवादी आहे. ज्याला जिवंत पकडण्यात आले आहे. तो चार महिन्यांआधी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. जेव्हा आम्ही त्याच्या घरी गेलो, तेव्हा त्याच्या आई आणि बहिणिने त्याने घरी परतावे अशी विनंती केली. आम्ही त्याच्या आईला आश्वासन दिले की, जर तो आमच्या समोर आला तर आम्ही त्याचे एनकाऊंटर करणार नाही.”

लेफ्टनंट कर्नलने सांगितले की, मागील एक महिन्यापासून येथील दहशतवाद्यांच्या हालचालींवर आम्ही नजर ठेवून होते. बिजनारी परीसराला वेढा घातला होता. यादरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या अनेक ग्राऊंड वर्करला अटक करण्यात आली, ज्यांच्याकडून पाक दहशतवादी आणि सोहेलच्या ठिकाणाची माहिती मिळाली. जिथे जाऊन लष्कराच्या जवानांनी सोहेल आणि इतर तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले.

या दहशतवाद्यांजवळून एके-47, दोन ग्रेनेड, एक पिस्टल आणि दोन मॅग्झीन लष्कराने हस्तगत केल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *