सैन्य भरतीला आलेले काश्मिरी तरुण म्हणाले, पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊ, भारतासाठी बलिदानासाठीही तयार

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा लष्कर भरतीचं आयेजन करण्यात आलं आहे. या लष्कर भरतीत शेकडो तरुणांनी सहभाग घेतला. यावेळी काश्मीर खोऱ्यातील तरुणांमध्ये भारतीय लष्करात भरती होण्यासाठी कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली.

सैन्य भरतीला आलेले काश्मिरी तरुण म्हणाले, पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊ, भारतासाठी बलिदानासाठीही तयार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा लष्कर भरतीचं आयेजन करण्यात आलं आहे (Jammu- Kashmir Army Recruitment 2019). या लष्कर भरतीत शेकडो तरुणांनी सहभाग घेतला. जिथे एकेकाळी दहशतवादी तयार करण्याची कारखाना असायचा त्याच ठिकाणी आज भरतीची ही प्रक्रिया घेण्यात येत आहे (Jammu-Kashmir).

लष्कर भरती प्रक्रिया ही 3 सप्टेंबरपासून ते 9 सप्टेंबरपर्यंत घेण्यात येणार आहे (Indian Army Recruitment 2019). यामध्ये रियासी जिल्ह्यासोबतच पुंछ, राजोरी, उधमपूर, डोडा, किश्तवाड, रामबन येथील तरुण सहभागी होणार आहेत. या लष्कर भरतीसाठी जम्मू-काश्मीरमधील जवळपास 29 हजार तरुणांनी अर्ज दाखल केला आहे. यापैकी दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुणांना बोलवण्यात येणार आहे.

भरती प्रक्रियाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज (3 सप्टेंबर)तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. काश्मीर खोऱ्यातील तरुणांमध्ये लष्कराची खाकी वर्दी घालण्यासाठीचा एक वेगळाच जोश पाहायला मिळाला. तसेच, यावेळी तरुणांनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’च्या घोषणाही दिल्या.

आम्ही पाकिस्तानला जसाच तसं उत्तर देऊ, जर दोशासाठी प्राण देण्याची गरज पडली तेही हसत-हसत अर्पण करु, अशी भावना लष्करात भरती होण्यासाठी रामबन आणि किश्तवाड जिल्ह्यातून आलेल्या तरुणांनी व्यक्त केल्या. त्यामुळे या तरुणांच्या मनात देशासाठी किती प्रेम आहे हे दिसून येतं. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे, असं यावरुन दिसून येतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *