... म्हणून या महापालिकेच्या निकालावर थेट मोदी आणि शाहांचं ट्वीट

काँग्रेसने एक आणि राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या. भाजपने या निवडणुकीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सात जागा जास्त जिंकल्या आहेत. या निकालानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही ट्वीट करुन स्थानिक भाजपचं अभिनंदन केलंय.

Junagadh Municipal Corporation, … म्हणून या महापालिकेच्या निकालावर थेट मोदी आणि शाहांचं ट्वीट

गांधीनगर : लोकसभा निवडणुकीत गुजरातच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्यानंतरही भाजपची जादू कायम आहे. गुजरातमधील जुनागड महापालिकेच्या निवडणुकीत (Junagadh Municipal Corporation/JMC result) भाजपने 60 पैकी 51 जागांवर विजय मिळवलाय. तर काँग्रेसने एक आणि राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या. भाजपने या निवडणुकीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सात जागा जास्त जिंकल्या आहेत. या निकालानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही ट्वीट करुन स्थानिक भाजपचं अभिनंदन केलंय.

जुनागड शहरातील 14 वॉर्डांच्या एकूण 60 पैकी 56 जागांसाठी रविवारी मतदान झालं होतं. तीन जागांवर भाजपचे उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले होते. तर एका जागेवर काँग्रेस उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपच्या उमेदवाराला समर्थन जाहीर केलं.

या निवडणुकीत काँग्रेसला एकूण 14 जागांचं नुकसान झालंय. काँग्रेसला जुनागड शहरात नेतृत्त्वाची गरज असल्याचं बोललं जातं. स्थानिक चेहरा नसल्यामुळे काँग्रेसला एवढ्या दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहर अध्यक्ष विनू अमीपारा यांनी राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. या निवडणुकीचं महत्त्व एवढं होतं, की विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी यांनी मतदारांचे आभार मानले.

गुजरातमध्ये आयोजित जुनागड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आणि जिल्ह्यातील विविध पोटनिवडणुकीत मतदारांना भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केलंय. गुजरातच्या जनतेने नेहमीच विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवलाय. सर्वांचे मनापासून आभार, अशा शब्दात मोदींनी मतदारांचे आभार मानले.

अमित शाहांनीही मतदारांचे आभार मानले. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री विजय रुपाणी, नितीन भाई पटेल, जीत वाघानी आणि सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन. विकास आणि प्रगतीसाठी भाजपावर पुन्हा एकदा विश्वास टाकल्याबद्दल गुजरातच्या मतदारांचे आभार, असं अमित शाह म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *