Forbes च्या यादीत कन्हैया कुमार आणि प्रशांत किशोर यांना स्थान

'फॉर्ब्स'ने कन्हैया कुमार आणि प्रशांत किशोर यांना आगामी दशकातला निर्णायक चेहरा म्हटले आहे.

Forbes च्या यादीत कन्हैया कुमार आणि प्रशांत किशोर यांना स्थान
Follow us
| Updated on: Jan 07, 2020 | 4:19 PM

नवी दिल्ली : प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या ‘फोर्ब्स’ मॅगझिनमध्ये जगभरातील उदयोन्मुख टॉप 20 लोकांची (Forbes top 20 list) नावे प्रकाशित होणार आहेत. या टॉप 20 लोकांमध्ये जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर (Forbes top 20 list) यांचे नाव सामील आहे.

‘फॉर्ब्स’ने कन्हैया कुमार आणि प्रशांत किशोर यांना आगामी दशकातला निर्णायक चेहरा म्हटले आहे. टॉप 20 च्या यादीत कन्हैया 12 व्या स्थानावर आहे तर प्रशांत किशोर 16 व्या स्थानावर आहेत. या दोघांसोबतच इतर आणखी 5 भारतीयांचा या यादीत समावेश आहे.

कन्हैयाबाबत काय लिहले आहे?

‘भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 32 वर्षीय नेता कन्हैया कुमार भविष्यात भारताच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत. 2016 साली ते जवाहरलाल नेहरु विद्यालयाच्या विद्यार्थी राजकारणाचा एक चेहरा बनले. त्यावेळी त्यांना देशद्रोह सारख्या आरोपांना तोंड द्यावे लागले. त्यांनी 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बेगूसराय मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला’, असे कन्हैयाच्या बाबत ‘फॉर्ब्स’ने म्हटले आहे.

फोर्ब्सने प्रशांत किशोर यांच्याबद्दल काय म्हटले आहे?

‘प्रशांत किशोर हे 2011 सालाच्या राजकारणाचे रणनीतीकार आहेत. 42 वर्षीय प्रशांत किशोर यांनी भाजपला गुजरातमध्ये सत्ता मिळवण्यासाठी मौल्यवान मदत केली. 2014 साली त्यांनी नरेंद्र मोदी यांचे रणनीतीकार म्हणून काम केले. सध्या ते एका संघटनेचे संरक्षक म्हणून काम करत आहेत. २०१९ साली त्यांची कंपनी I-PAC ने तेलंगनामध्ये वायएसआर जगन मोहन रेड्डी आणि महाराष्ट्रात शिवसेनासाठी काम केले. या दोन्ही भागातील विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली’, असे ‘फॉर्ब्स’ने प्रशांत किशोर यांच्याबाबत म्हटले आहे.

‘फॉर्ब्स’च्या यादीत सर्वात पहिला नंबर हा अमेरिकेचे राजकीय विश्लेषक आणि कॉमेडियन हसन मिन्हाज आहेत. तर 20 व्या स्थानी किनियाई मॅराथन धावक अॅलिवूड किचपोगे यांचे नाव आहे. याशिवाय हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोइत्रा यांचे नाव देखील या यादीत आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.