सीसीडी संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

सीसीडी संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

बंगळुरु : देशातील सर्वात प्रसिद्ध कॉफी रेस्टॉरंट कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day) चे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ (VG Siddhartha) यांचा मृतदेह नेत्रावती नदीत सापडला आहे. सोमवारी संध्याकाळपासून सिद्धार्थ बेपत्ता होते. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानुसार नेत्रावती नदीत पोलिसांनी शोध मोहित सुरु केली होती.

सिद्धार्थ यांच्या ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी 6 वाजल्याच्या सुमारास सिद्धार्थ नदीजवळ गाडीतून उतरले. त्यानतंर त्यांनी ड्रायव्हरला मी लगेचच येतो असे सांगितले. यानंतर जवळपास अर्धा तास ड्रायव्हरने सिद्धार्थ यांची वाट पाहिली. मात्र 6.30 पर्यंत सिद्धार्थ न परतल्याने ड्रायव्हरने त्यांच्या कुटुंबियांना याबाबत सांगितले.

व्ही. जी. सिद्धार्थ यांनी व्यावसायिक तोट्यामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत होता. त्यानुसार कर्नाटक पोलिसांनी नदी आणि आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं होते. बोटीच्या सहाय्याने पोलीस सिद्धार्थ यांचा नदीत शोध घेत होते. तसेच इतर आजूबाजूच्या ठिकाणीही चौकशी केली जात होती. दरम्यान तब्बल 72 तासांना सिद्धार्थ यांचा मृतदेह नेत्रावती नदीत सापडला.

देशातील प्रसिद्ध व्यावसायिकाने आत्महत्या केल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार आणि बी.एल. शंकर यांनी एस. एम. कृष्णा यांची घरी जाऊन भेट घेतली.

कोण आहेत व्ही. जी. सिद्धार्थ ?

व्ही. जी. सिद्धार्थ  हे देशातील प्रसिद्ध रेस्टॉरंट कॅफे कॉफी डे चे संस्थापक आहेत. याशिवाय सिद्धार्थ हे माजी मुख्यमंत्री आणि परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा (SM Krishna) यांचे जावई आहेत.

संबधित बातम्या : 

CCD चे मालक सिद्धार्थ यांचा शिकाऊ नोकरदार ते कॉफी किंगचा प्रवास

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *