'कर्नाटकचा शहाजहान', पत्नीचा अपघातात मृत्यू, स्वप्नपूर्तीसाठी जीवंत भासणारा खास सिलिकॉन पुतळा

कर्नाटकमध्ये एका व्यापाऱ्याने पत्नीच्या आठवणीत हुबेहुब दिसणारा सिलिकॉनचा पुतळा तयार करुन घेतला (Silicon Statue of wife in Karnataka).

'कर्नाटकचा शहाजहान', पत्नीचा अपघातात मृत्यू, स्वप्नपूर्तीसाठी जीवंत भासणारा खास सिलिकॉन पुतळा

बंगळुरु : कोरोना व्हायरसच्या संकटाशी झुंज देताना आजूबाजूला सर्वच ठिकाणी दुखद घटना घडताना दिसतात. मात्र, अशाही वातावरणात काही घटना आपल्या चेहऱ्यावर हास्य आणून जातात. अशीच एक घटना कर्नाटकमध्ये पाहायला मिळाली. कर्नाटकमध्ये एका व्यापाऱ्याने पत्नीच्या वियोगाने दुःखी न होता तिच्या प्रेमापोटी हुबेहुब दिसणारा सिलिकॉनचा पुतळा तयार करुन घेतला (Silicon Statue of wife in Karnataka). तसेच त्या पुतळ्यासह आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला. यातून या व्यापाऱ्याने आपल्या पत्नीसोबत पाहिलेलं स्वप्नही पूर्ण केलं.

कर्नाटकमधील कोप्पलमध्ये राहणाऱ्या व्यापारी श्रीनिवास गुप्ता यांच्या पत्नी माधवी यांचा 2017 मध्ये एका कार अपघातात मृत्यू झाला. माधवी आणि श्रीनिवास यांनी एकत्र एका नव्या घरांचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांच्या जीवंतपणी हे स्वप्न पूर्ण झालं नव्हतं. मात्र, श्रीनिवास यांनी पत्नी गेल्यानंतरही सोबत पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं. यासाठी श्रीनिवास गुप्ता यांनी आपल्या पत्नीचा सिलिकॉन पुतळा बनवून घेतला आणि त्याच्यासोबत गृहप्रवेश केला.


श्रीनिवास यांनी सांगितलं, “बंगळुरुच्या श्रीधर मूर्ती या आर्टिस्टने एक वर्ष मेहनत घेऊन हा पुतळा बनवला आहे. यासाठी सिलिकॉन आणि मेण या गोष्टींचा उपयोग करण्यात आला. आधी माझ्या मनात केवळ मेणाचा पुतळा करण्याची कल्पना आली होती. मात्र उष्ण भागात मेणाच्या तुलनेत सिलकॉनचा पुतळा अधिक योग्य राहिल असा सल्ला आर्टिस्टने दिला. त्यानंतर हा पुतळा तयार करण्यात आला.”

आपली पत्नी सोबत नसताना तिच्या आठवणीत सिलिकॉनचा पुतळा तयार करणारे श्रीनिवास गुप्ता गृहप्रवेश करताना मात्र भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. या नव्या घरात माझ्यासह माझी पत्नी देखील आली आहे. याचा मला खूप आनंद आहे. हे घर तिचं स्वप्न होतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

श्रीनिवास यांची पत्नी माधवी यांचा 2017 मध्ये तिरुपती बालाजीला जात असताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे या अपघातात त्यांच्या दोन्ही मुली देखील सोबत होत्या. मात्र, त्यांना किरकोळ जखम झाली आणि त्या बचावल्या.

संबंधित व्हिडीओ :


हेही वाचा :

Rahat Indori passes away | प्रख्यात शायर राहत इंदौरी यांचं निधन

10 राज्यात 80% कोरोना रुग्ण, मोदींचा 10 मुख्यमंत्र्यांना सल्ला, 72 तासांच्या प्लॅनिंगवर भर

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, आईसह दोन मुलांचा मृत्यू

Silicon Statue of wife in Karnataka

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *