कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, प्रकाश जावडेकरांनाही कोरोनाची लागण

यापूर्वी 78 वर्षांचे येडियुरप्पा यांना 2 ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजतेय. BS Yediyurappa Yeddyurappa Prakash Javadekar Covid positive

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:49 PM, 16 Apr 2021
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, प्रकाश जावडेकरांनाही कोरोनाची लागण
BS Yediyurappa Yeddyurappa Prakash Javadekar Covid positive

बंगळुरूः कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (Karnataka Chief Minister B. S. Yeddyurappa) यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेय. त्यांचा चाचणी अहवाल शुक्रवारी परत पॉझिटिव्ह आला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठ महिन्यांत दुसर्‍यांदा येडियुरप्पांना कोरोनाची लागण झालीय. यापूर्वी 78 वर्षांचे येडियुरप्पा यांना 2 ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजतेय. (Karnataka Chief Minister Yeddyurappa tested positive for second time, Prakash Javadekar also infected with corona)

आज कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली: प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. तसेच मी आज कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. गेल्या 2-3 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया स्वत: ची चाचणी करून घ्यावी, असंही प्रकाश जावडेकरांनी सांगितलंय.

सध्या मी ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मला रुग्णालयात दाखल केले

तर येडियुरप्पा यांनीसुद्धा ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचं सांगितलंय. ते म्हणाले, मला सौम्य ताप आल्यानंतर कोरोना चाचणी केली असता, मला संक्रमण झाल्याचं समजलं. सध्या मी ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मला रुग्णालयात दाखल केले जात आहे, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिलीय. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अलीकडेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिलाय. कर्नाटक मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीएम येडियुरप्पा यांना ताप आला होता आणि त्यानंतर ते तपासणीसाठी रामय्या रुग्णालयात गेले. तिकडे कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आलीय.


संबंधित बातम्या

pakistan social media banned | पाकिस्तानमध्ये फेसबुक, इन्टाग्राम, टेलिग्राम, टिकटॉक सगळं बंद; कारण काय ?

Oxygen Tanker : ऑक्सिजनचं उत्पादन वाढवा, टँकर्स सुसाट सोडा, पंतप्रधान मोदींचे आदेश

Karnataka Chief Minister Yeddyurappa tested positive for second time, Prakash Javadekar also infected with corona