कर्नाटकात भीषण बस अपघात, 25 जणांचा मृत्यू

बंगळुरु (कर्नाटक): कर्नाटकात कालव्यात बस कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. कर्नाटकमधील पांडवपुरा तालुक्यातील कनागमराडी येथे ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाकडून युद्घ पातळीवर मदतकार्य सुरु आहे. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रन सुटल्याने हा अपघात …

कर्नाटकात भीषण बस अपघात, 25 जणांचा मृत्यू

बंगळुरु (कर्नाटक): कर्नाटकात कालव्यात बस कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. कर्नाटकमधील पांडवपुरा तालुक्यातील कनागमराडी येथे ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाकडून युद्घ पातळीवर मदतकार्य सुरु आहे.

बस चालकाचे गाडीवरील नियंत्रन सुटल्याने हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी घटनास्थळी पोहोचून आढावा घेतला. या अपघाताची चौकशी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.


अपघातग्रस्त बसमध्ये बहुसंख्य विद्यार्थी असल्याचं समजतंय. शनिवारी शाळेचा अर्धा दिवस आटोपल्यानंतर मुलांना सोडत असताना, कनागमराडी इथे एका कालव्यात बस कोसळली. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या बस अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं. त्यानंतर स्वत:ही घटनास्थळाकडे रवाना झाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *