शबरीमाला वाद: भाजप, माकप नेत्यांच्या घरावर देशी बॉम्ब फेकले

तिरुअनंतपूरम: केरळमधील शबरीमाला इथल्या भगवान अयप्पा मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या तणावाचं आता हिंसेत रुपांतर होत आहे. कन्नूर जिल्ह्यातील थलसरी इथं विविध पक्षांच्या नेत्यांच्या घरावर हल्ले होत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPM), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांच्या घरांवर हल्ला झाला. शुक्रवारी रात्री भाजप खासदाराच्या घरावर देशी बॉम्ब फेकण्यात आला. …

शबरीमाला वाद: भाजप, माकप नेत्यांच्या घरावर देशी बॉम्ब फेकले

तिरुअनंतपूरम: केरळमधील शबरीमाला इथल्या भगवान अयप्पा मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या तणावाचं आता हिंसेत रुपांतर होत आहे. कन्नूर जिल्ह्यातील थलसरी इथं विविध पक्षांच्या नेत्यांच्या घरावर हल्ले होत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPM), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांच्या घरांवर हल्ला झाला. शुक्रवारी रात्री भाजप खासदाराच्या घरावर देशी बॉम्ब फेकण्यात आला. त्यानंतर काही वेळातच माकपच्या आमदाराच्या घरावरही असाच हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

त्याआधी महिलांनी मंदिर केल्याप्रकरणी गुरुवारी बंद पुकारण्यात आला होता, त्यावेळीही आंदोलकांनी हिंसक पवित्रा घेतला. यामध्ये शंभरपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. याशिवाय पोलिस आणि माध्यमकर्मींनाही दुखापत झाली.

पोलिसांनी आतापर्यंत 33 जणांना ताब्यात घेतलं आहे, तर 76 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 25 लोकांना रिमांड आणि 204 लोकांना अटक करण्यात आली आहे.

माकप आमदार ए एन शमशीर यांच्यावर शुक्रवारी रात्री देशी बॉम्बने हल्ला केला. त्यानंतर भाजप नेते आणि राज्यसभा खासदार वी मुरलीधरन यांच्या घरावर देशी बॉम्ब फेकण्यात आले. आंदोलकांनी मोटरसायकलवरुन येऊन हे बॉम्बहल्ले केले.

महिलांचा मंदिर प्रवेश

केरळमधील शबरीमाला मंदिरात 2 जानेवारीला ऐतिहासिक घटना घडली. सुमारे 40 वर्षीय दोन महिलांनी बंदी झुगारुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन दर्शन घेतलं. बिंदू आणि कनकदुर्गा या क्रांतीकारी महिलांनी मध्यरात्रीपासून मंदिराच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पहाटे 3.45 च्या सुमारास मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. या महिलांसोबत काही पोलीस आणि अधिकारी होते. मात्र महिलांनी मंदिर प्रवेश करताच मंदिर प्रशासनाने शुद्धीकरणासाठी मंदिर बंद केलं.

सुप्रीम कोर्टानं आदेश देऊनही महिलांना शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. महिलांना या मंदिरामध्ये शेकडो वर्षांपासून बंदी आहे. पण ही बंदी अन्यायकारक आणि भेदभाव करणारी असल्याचं सुप्रीम कोर्टानं दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. मात्र स्थानिक आणि कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामुळं या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. अनेक महिलांनी प्रवेशाचा प्रयत्न केला, पण त्यांना वेळोवेळी रोखण्यात आलं होतं.

शबरीमाला मंदिर वाद

केरळमधील शबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्षीय महिलांना प्रवेशबंदी आहे. पंरपरेनुसार भगवान अयप्पा ब्रह्मचारी होते त्यामुळे महिलांना या मंदिरात प्रवेशबंदी होती. मासिक पाळीमुळे महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ स्थापून 4-1 ने निर्णय दिला होता. शबरीमाला मंदिरातील प्रवेशापासून कोणत्याही वयाच्या महिलांना रोखू शकत नाही, असा निर्णय कोर्टाने दिला. या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठात तत्कालिन सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती नरीमन, न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या 

महिलांच्या प्रवेशानंतर शबरीमाला मंदिर शुद्धीकरणासाठी बंद 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *