जादू दाखवण्यासाठी जादूगार गंगेत उतरला आणि गायब झाला!

जादू दाखवण्यासाठी या जादूगाराने गंगेत उडी घेतली आणि त्यानंतर तो कुणालाही दिसला नाही. गेल्या रविवारी (16 जून) या जादूगाराने आपले हात-पाय लोखंडाच्या साखळीने बांधून घेतले आणि त्यानंतर त्याने गंगेत उडी घेतली.

जादू दाखवण्यासाठी जादूगार गंगेत उतरला आणि गायब झाला!

कोलकाता : जादू दाखवण्यासाठी एका जादूगाराने अपला जीव धोक्यात घातला. जादू दाखवण्यासाठी या जादूगाराने गंगेत उडी घेतली आणि त्यानंतर तो कुणालाही दिसला नाही. गेल्या रविवारी (16 जून) या जादूगाराने आपले हात-पाय लोखंडाच्या साखळीने बांधून घेतले आणि त्यानंतर त्याने गंगेत उडी घेतली. कोलकात्याच्या हावडा ब्रिजजवळ ही घटना घडली. जादूगाराच्या कलेनुसार, त्याला हात-पाय बांधलेले असूनही काहीच मिनिटांत पाण्यातून बाहेर यायचं होतं. मात्र, खूप वेळ झाला तरीही जादूगार बाहेर आला नाही. त्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी तात्काळ पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अजूनही गंगा नदीत जादूगाराचा शोध घेतला जात आहे. मात्र, अज्ञाप या जादूगाराचा थांगपत्ता लागलेला नाही. जोपर्यंत या जादूगाराचा शोध लागत नाही तोपर्यंत त्याला मृत घोषित केलं जाऊ शकत नाही, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. या जादूगाराने क्रेनच्या सहाय्याने नदीत उडी घेतली. त्याला प्रेक्षकांना त्याची ट्रिक दाखवायची होती. मात्र, त्यात जादूगार अपयशी ठरला, असं जिल्हाधिकारी सैय्यद वकार रजा यांनी सांगितलं.

जादूगाराचं नाव चंचल लाहिडी असून तो 41 वर्षांचा आहे. चंचल हे पश्चिम बंगालच्या सोनारपूर शहरात राहतो. व्यावसिक स्तरावर तो ‘मॅनड्रेक’ या नावाने ओळखला जातो, अशी माहिती पोलिसांनी दिली. लाहिडी हे प्रसिद्ध जादूगार हॅरी हूडीनी यांच्याशी प्रभावित होते. ते जादूगार हॅरी हूडीनी यांच्या प्रसिद्घ ट्रिकची नक्कल करण्याचा प्रयत्न करत होते.

‘चाइनीज वाटर टॉर्चर सेल’ ही हुडीनी यांची प्रसिद्ध ट्रिक होती. ही ट्रिक सर्वात जबरदस्त आणि तितकीच खतरनाक समजली जाते. यामध्ये त्यांच्या पायांवर टाळं लावून त्यांनी पाण्याने भरलेल्या टँकमध्ये उलटं टाकलं जायचं. हुडीनी हे पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करायचे मात्र ते निघू शकत नव्हते. जेव्हा लोकांना वाटायचं की ते बुडाले, तेव्हा अचानकपणे ते बाहेर यायचे. हे पाहून सर्वच आश्चर्यचकित व्हायचे.

लाहिडी यांनी त्यांच्या हात-पायांना एका लोखंडाच्या साखळीने सहा कुलुपांच्या मदतीने बांधलं होत, असं प्रत्यक्षदर्शिंनी सांगितलं. तुम्ही अशाप्रकारे आपला जीव धोक्यात का टाकत आहात, असा प्रश्न तेथे उपस्थित पत्रकाराने लाहिडी यांना केला. तेव्हा “मी यशस्वी झालो तर हे मॅजिक असेल, नाहीतर याला ट्रॅजिक समजाल”, असं लाहिडी म्हणाले होते. लोक जादूकडे आकर्षित व्हावे म्हणून लाहिडीने ही ट्रिक करण्याचा निर्णय घेतला होता.

चंचल लाहिडी यांनी गंगा नदीमध्ये ही ट्रिक करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेतली होती. तरीही ते ट्रिक करत असताना तिथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा नसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

आता चहा भाव खाणार, तुम्हाला रिफ्रेश करणारा चहा महागणार?

मराठीत शपथ, भगवी सही, हेमंत गोडसेंचा मराठी बाणा, कोणत्या खासदाराची कुठल्या भाषेत शपथ?

तेलंगणाचा 80 हजार कोटींचा सिंचन प्रकल्प, तीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

धावत्या ट्रेनमध्ये प्रसव वेदना, डॉक्टर मिळेना, टीसीकडूनच महिलेची प्रसुती

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *