लालकृष्ण अडवाणींचा राजकारणातून संन्यास, गडकरींची माहिती

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात याबाबत माहिती दिली. लालकृष्ण अडवाणी यांचं वय झालंय, प्रत्येकाच्या निवृत्तीचं एक वय असतं. आमच्यासाठीही हे लागू आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली. 91 वर्षीय अडवाणींना यावेळी भाजपने तिकीट दिलेलं नाही. पण त्यांनीच निवृत्ती घेतली असल्याची माहिती गडकरींनी दिली. …

lal krishna advani, लालकृष्ण अडवाणींचा राजकारणातून संन्यास, गडकरींची माहिती

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात याबाबत माहिती दिली. लालकृष्ण अडवाणी यांचं वय झालंय, प्रत्येकाच्या निवृत्तीचं एक वय असतं. आमच्यासाठीही हे लागू आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली. 91 वर्षीय अडवाणींना यावेळी भाजपने तिकीट दिलेलं नाही. पण त्यांनीच निवृत्ती घेतली असल्याची माहिती गडकरींनी दिली.

अडवाणींचं सध्याचं वय 91 वर्षे आहे, जे पुढच्या निवडणुकीपर्यंत 96 वर्षे होईल. त्यामुळेच अडवणींऐवजी यावेळी भाजपने दुसरा उमेदवार दिला आहे. अडवाणी आतापर्यंत गुजरातमधील गांधीनगरच्या जागेवरुन लढायचे. यावेळी त्यांच्या जागी भाजपाध्यक्ष अमित शाह गांधीनगरमधून लढणार आहेत. भाजपवर अडवणांनी डावलल्यावरुन टीका होत असल्यामुळे गडकरींनी त्यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं.

लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पंतप्रधान म्हणून 2014 मध्ये सर्वात अगोदर विरोध केला होता. तेव्हापासूनच अडवाणींना बाजूला सारल्याचा आरोप केला जातो. अडवाणींसह भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनाही तिकीट दिलेलं नाही. भाजपने मार्गदर्शक मंडळामध्ये अडवाणी आणि इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांचा समावेश केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *