राहुल गांधींविरोधात ललित मोदी लंडनमध्ये तक्रार दाखल करणार

लंडन : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना आयपीएलचा संस्थापक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी फरार आरोपी ललित मोदीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात दंड थोपटले आहे. राहुल गांधी यांनी ‘सारे मोदी चोर’ असे म्हटले होते, त्यावर ललित मोदी नाराज आहे. आता त्याने राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. ललित मोदीने ट्विट केले, ‘सारे मोदी चोर हैं’ …

राहुल गांधींविरोधात ललित मोदी लंडनमध्ये तक्रार दाखल करणार

लंडन : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना आयपीएलचा संस्थापक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी फरार आरोपी ललित मोदीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात दंड थोपटले आहे. राहुल गांधी यांनी ‘सारे मोदी चोर’ असे म्हटले होते, त्यावर ललित मोदी नाराज आहे. आता त्याने राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे.

ललित मोदीने ट्विट केले, ‘सारे मोदी चोर हैं’ या प्रकरणाला न्यायालयात घेऊन जाणार आहे. लंडनच्या न्यायालयात याबाबत तक्रार दाखल करेन. यावेळी मोदीने राहुल गांधीवर जोरदार टीका केली आणि काँग्रेसच्या घोटाळ्यांची यादीच जाहीर केली. तसेच 5 दशकांपासून भारताला लुटणारे गांधी कुटुंब माझ्यावर आरोप करत असल्याचे टीकास्त्रही मोदीने सोडले.

राहुल गांधींवर दाखल याचिका

जर्मनीमध्ये भारताची प्रतिमा मलिन करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत बिहारमधील एका वकिलाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. सुधीर कुमार ओझा असे या वकिलाचे नाव होते. अॅड. ओझा यांनी राहुल गांधींवर विदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला होता. गांधी यांनी भारतात होत असलेल्या आयसिसच्या (ISIS) प्रसाराला योग्य ठरवले होते, असा आरोप ओझांनी केला होता. याच वकिलांनी त्याआधी अन्य एका प्रकरणात तेजस्वी यादव यांच्याविरोधातही याचिका दाखल केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *