टांगेवाला ते मसाला किंग… धर्मपाल गुलाटींनी अवघ्या दीड हजार रुपयांत उभारलं साम्राज्य!

'असली मसाले सच-सच, एमडीएच...एमडीएच...' या टॅग लाइनने घराघरात प्रसिद्ध झालेले आणि गेली सहा दशके आपल्या अस्सल मसाल्यांनी देशभरातील घरातील खाद्य पदार्थांना अस्सल देसी चव आणणारे एमडीएच मसाले उद्योग समूहाचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं आज पहाटे निधन झालं. (Life story of MDH owner masala king Dharampal Gulati)

टांगेवाला ते मसाला किंग... धर्मपाल गुलाटींनी अवघ्या दीड हजार रुपयांत उभारलं साम्राज्य!
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 11:08 AM

नवी दिल्ली: ‘असली मसाले सच-सच, एमडीएच…एमडीएच…’ या टॅग लाइनने घराघरात प्रसिद्ध झालेले आणि गेली सहा दशके आपल्या अस्सल मसाल्यांनी देशभरातील घरातील खाद्य पदार्थांना अस्सल देसी चव आणणारे एमडीएच मसाले उद्योग समूहाचे मालक, ‘महाशय’ धर्मपाल गुलाटी यांचं आज पहाटे निधन झालं. टांगेवाला ते मसाला किंग असा त्यांचा प्रवास थक्क करणारा राहिला आहे. धर्मपाल गुलाटी अवघे दीड हजार रुपये घेऊन नशीब अजमावण्यासाठी दिल्लीत आले. सुरुवातीला काहीकाळ टांगा चालवण्याचं काम केलं आणि पुढे याच दीड हजार रुपयांतून त्यांनी एमडीएच मसल्याचं साम्राज्य निर्माण केलं. (Life story of MDH owner masala king Dharampal Gulati)

धर्मपाल गुलाटी यांनी वयाच्या 98व्या वर्षी विकासपुरी येथील एका रुग्णालयात आज पहाटे 5.38 वाजता अंतिम श्वास घेतला. 1947मध्ये भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर ‘महेशियां दी हट्टी’चे मालक धर्मपाल गुलाटी भारतात आले होते. भारतात आले तेव्हा त्यांच्याकडे अवघे दीड हजार रुपये होते. दिल्लीत आल्यावर त्यांनी आधी 650 रुपयांध्ये एक घोडा आणि टांगा खरेदी केला. त्यानंतर दिल्ली रेल्वे स्थानकात त्यांनी टांगा सुरू करून कुटुंबाचं पोट भरण्यास सुरुवात केली. मात्र, टांगा चालवण्यात त्यांचं मन रमलं नाही. काही दिवसांमध्येच त्यांनी हा टांगा भावाला देऊन करोलबागमध्ये अजमल खान रोडवर मसाले विकण्यास सुरुवात केली.

कपडे आणि तांदूळही विकले

धर्मपाल गुलाटी यांचा जन्म 27 मार्च 1923मध्ये सियालकोट (आताच्या पाकिस्तानात) झाला होता. 1933मध्ये त्यांनी इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्याआधीच शाळेला रामराम ठोकला. 1937मध्ये त्यांनी वडिलांच्या मदतीने आपला व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या काळात त्यांनी साबुण, बढई, कपडे, हार्डवेअर आणि तांदूळ विक्रीचाही व्यवसाय केला. पण त्यात यश न आल्याने त्यांनी पुन्हा वडिलांच्या ‘महेशियां दी हट्टी’ या दुकानात काम सुरू केलं. ‘देगी मिर्च’च्या नावानेही हे दुकान सियालकोटमध्ये प्रसिद्ध होतं. त्यानंतर भारत-पाक फाळणीनंतर 27 सप्टेंबर 1947मध्ये ते भारतात आले.

1959 मध्ये एमडीएचची फॅक्ट्री सुरू

सियालकोटचे देगी मिर्च मसालेवाले धर्मपाल गुलाटी दिल्लीत व्यवसाय करत असल्याचं लोकांना जेव्हा कळलं तेव्हा ग्राहकांनी हे मसाले घेण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गुलाटी यांचा व्यवसाय वाढू लागला. ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर गुलाटी कुटुंबाने 1959मध्ये एमडीएच मसाल्यांचा पहिला कारखाना राजधानी दिल्लीतील किर्तीनगरमध्ये सुरू केला. त्यानंतर करोल बागमध्ये अजमल खान रोडवर अजून एक कारखाना सुरू केला. 60च्या दशकात करोलबागमध्ये एमडीएचने बस्तान बसवतानाच प्रसिद्धीही मिळवली होती.

लंडन आणि दुबईतही

एमडीएच मसल्याच्या ब्रँड केवळ भारतापर्यंत मर्यादित राहिला नाही, तर हा ब्रँड सातासमुद्रापारही गेला. एमडीएचकडून 50 विविध प्रकारच्या मसल्यांचं उत्पादन केलं जातं. एमडीएचचं कार्यालय केवळ भारतातच नव्हे तर दुबई आणि लंडनमध्येही आहे. सध्या एमडीएचचे 60 हून अधिक उत्पादने बाजारात आहेत. परंतु देगी मिर्च, चाट मसाला आणि चना मसाल्याला ग्राहकांची सर्वाधिक पसंती असते.

सर्वाधिक वेतन घेणारे गुलाटी

‘आयआयएफएल हुरुन इंडिया रिच 2020’ यादीत सामिल होणारे धर्मपाल गुलाटी हे भारतातील सर्वाधिक बुजुर्ग श्रीमंत व्यक्ती होते. केवळ दीड हजार रुपये घेऊन भारतात आलेल्या गुलाटी यांची संपत्ती 5400 कोटी इतकी आहे. त्यांना स्वत:ला वर्षाला 25 कोटी रुपये वेतन मिळत होते. इतर कोणत्याही कंपन्यांच्या सीईओच्या तुलनेत सर्वाधिक वेतन घेणारेही गुलाटी हेच एकमेव होते. (Life story of MDH owner masala king Dharampal Gulati)

रुग्णालये, शाळा उभारल्या

धर्मपाल गुलाटी केवळ मसाला उद्योगापुरतेच मर्यादित राहिले नाहीत. तर त्यांनी समाजसेवेतही तेवढंच मोठं योगदान दिलं आहे. इयत्ता पाचवीपर्यंत शिकलेल्या गुलाटी यांनी शाळा आणि रुग्णालये उभारून समाजाची सेवा केली. त्यांनी 20 हून अधिक शाळा सुरू केल्या आहेत. त्यांच्या या संपूर्ण योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. (Life story of MDH owner masala king Dharampal Gulati)

संबंधित बातम्या:

PHOTO | “असली मसाले सच सच….”, टांगेवाला ते मसाला किंग बनलेल्या धर्मपाल गुलाटी यांचा थक्क करणारा जीवन प्रवास

Dharampal Gulati | महाशय धर्मपाल गुलाटींच्या ‘MDH’ कंपनीच्या नावामागील कहाणी माहित आहे?

एमडीएचचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

(Life story of MDH owner masala king Dharampal Gulati)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.