Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; या 17 शहरात मिळणार नाही दारू, ‘मद्य’ मुक्त ‘प्रदेश’

मोठी बातमी समोर येत आहे, सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 17 शहरात दारू बंदी करण्यात आली आहे.

मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; या 17 शहरात मिळणार नाही दारू, 'मद्य' मुक्त 'प्रदेश'
Follow us
| Updated on: Jan 24, 2025 | 5:47 PM

मध्य प्रदेशातून मोठी बातमी समोर येत आहे, राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात दारू बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त खरगोन जिल्ह्यातल्या महेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता मध्य प्रदेशातील 17 शहरांमध्ये दारू बंदी लागू करण्यात आली आहे. ज्या शहरांमध्ये दारू बंदी लागू करण्यात आली आहेत, ती सर्व शहरे धार्मिक स्थळं आहेत.

या शहरांमध्ये आता दारू विक्रीला बंदी घालण्यात आली आहे, तसेच दारूची खरेदी करणाऱ्यावर देखील कडक कारवाई करण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. एक एप्रिलपासून या 17 शहरांमध्ये पूर्णपणे दारूबंदी लागू करण्यात येणार आहेत.समोर आलेल्या माहितीनुसार सुरुवातीला हा प्रयोग धार्मिक महत्त्व असणाऱ्या 17 शहरांमध्ये करण्यात आला आहे, त्यानंतर हळूहळू संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. एवढंच नाही तर आपआपल्या विभागांमध्ये मंत्र्यांना बदल्याचे अधिकार देखील देण्यात आले आहेत. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मंत्री बदल्यांसंदर्भात निर्णय घेऊ शकतात, असा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

कोणत्या शहरात मिळणार नाही दारू?

ओंकारेश्वर, महेश्वर, मण्डलेश्वर, ओरछा, मैहर, चित्रकूट नगर, दतिया, पन्ना, मण्डला, मुल्ताई, मंदसौर, अमरकंटक, सलकनपूर, बरमानकला,लिंगा, बरमानखुर्द, कुण्डलपूर, बांदकपूर या शहरात येत्या एक एप्रिलपासून दारू बंदी लागू करण्यात येणार आहे. दारू विक्री तसेच खरेदी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी नर्मदा किनार्‍यावर पूजा केली, राज्याच्या खुशालीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य प्रदेश सरकारनं हा मोठा निर्णय गेतला आहे, आता 17 शहरांमध्ये दारू मिळणार नाहीये, येत्या एक एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्याततच दारूबंदी करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते, अशी माहिती देखील समोर येत आहे.

'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की...
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की....
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द.
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात.
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका.
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष.
कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...'
कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...'.
'अंजली दमानियांचं पितळ उघडं पडलं...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'अंजली दमानियांचं पितळ उघडं पडलं...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
बाप आहे की हैवाण... पती-पत्नीच्या वादात पोटच्या चिमुकलीला आपटलं अन्...
बाप आहे की हैवाण... पती-पत्नीच्या वादात पोटच्या चिमुकलीला आपटलं अन्....
एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी, 'कॅट लव्हर' मालकाचा रहिवाशांना मनस्ताप
एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी, 'कॅट लव्हर' मालकाचा रहिवाशांना मनस्ताप.
'दादा...मला काम करताना त्रास होतो', महिला आमदाराची अजितदादांकडे तक्रार
'दादा...मला काम करताना त्रास होतो', महिला आमदाराची अजितदादांकडे तक्रार.