LIVE : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा 10 दिवसीय दुष्काळी दौरा

राज्यासह देशातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर...

LIVE : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा 10 दिवसीय दुष्काळी दौरा
Picture

9 जूनपासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दुष्काळ दौऱ्यावर

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे 9 जूनपासून राज्यात दुष्काळी दौऱ्यावर, उद्धव ठाकरे मराठवड्यात तर आदित्य ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील, दुष्काळी भागातील चारा छावण्यांमध्ये सध्या आश्रयास असलेल्या शेतकरी कुटुंबांना शिवसेना पुढील 10 दिवस जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार

06/06/2019,11:49AM
Picture

झोपलेल्या आईच्या कुशीतून मुलाला पळवलं

मुंबई : भिवंडीतून एक वर्षीय चिमुकल्याचं अपहरण, पहाटेच्या वेळी झोपलेल्या आईच्या कुशीतून मुलाला पळवलं, अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद, भिवंडीत लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ, पोलिसांकडून अपहरणरकर्त्याचा शोध सुरु

06/06/2019,9:46AM
Picture

भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांचं सहा वर्षांसाठी निलंबन

नागपूर : भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांचं सहा वर्षांसाठी निलंबन, पक्षाच्याच नेत्यांबद्दल अपशब्द बोलणं भोवलं, पक्षविरोधी कार्य करत असल्याचा आरोप, भाजपचे शहर उपाध्यक्ष जयहरी सिंह आणि अभय तिडके निलंबित, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांची कारवाई, दोन्ही भाजप कार्यकर्त्यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून सक्तीची कारवाई

06/06/2019,8:31AM
Picture

दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश

कोल्हापूर : असाध्य रोगावर जादूटोणा करुन उपाय करणाऱ्या भोंदूबाबाला अटक, दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाचा अंनिस कार्यकर्ते आणि पोलिसांकडून पर्दाफाश, प्रकरणी किसन जोशी आणि दिगंबर जोशी या दोन भोंदूबाबांना अटक

06/06/2019,8:32AM
Picture

नागपुरात 24 तासात 12 जणांचा आकस्मिक मृत्यू

नागपूर : शहरात गेल्या 24 तासात 12 जणांच्या मृत्युने खळबळ, उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता, शहराच्या विविध भागात आढळले मृतदेह, नागपुरात पारा 47 अंश सेल्सिअसच्या पार, वाढलेल्या तापमानात नागपुरकरांना उष्माघाताचा मोठा धोका

06/06/2019,8:32AM
Picture

कोकणात पावसाचे आगमन

सिंधुदुर्ग : कोकणात पावसाचे आगमन, पहाटेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतेक भागात दमदार पावसाची हजेरी, वीज आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ इत्यादी परिसरात पावसाची हजेरी.

06/06/2019,8:31AM
Picture

चक्री पाळण्यातून पडून 9 वर्षीय चीमुकलीचा मृत्यू

मुंबई : भिवंडीत चक्री पाळण्यात बसलेल्या 9 वर्षीय मुलीचा पाळण्यातून पडुन दुर्दैवी मृत्यू, ईद निमित्त समदनगर बगिचा या ठिकाणी लागलेल्या मेळ्यातील घटना, पोलिसांकडून अपघाती मृत्युची नोंद, पाळणा चालक फरार

06/06/2019,8:31AM
Picture

अकोल्यात 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

अकोला : शिर्ला गावातील शेत शिवारात 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या, मामाच्या घरी शिर्ला येथे राहायची, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

06/06/2019,8:30AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *