शिंदे-फडणवीस यांचे टेन्शन वाढवणारी बातमी, पण मोदींची लोकप्रियता कायम

एकीकडे देशातील जनता मोदी यांच्या पाठिशी ठाम दिसत आहे. परंतु राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. राज्यात सहा महिन्यांपुर्वी शिंदे- फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले आहे. परंतु लोकसभेतील ४८ जागांवर भाजप व शिंदे गटाला मोठा फटका बसणार आहे.

शिंदे-फडणवीस यांचे टेन्शन वाढवणारी बातमी, पण मोदींची लोकप्रियता कायम
देवेंद्र फडणवीस - एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 5:30 PM

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा २०२४ ची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा प्रयत्न भाजपकडून आहे. भाजपच्या या प्रयत्ना ‘इंडिया टुडेने सी-व्होटर’च्या पाहणीत बळ मिळाले आहे. सी-व्होटरने ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षण केला. आज लोकसभा निवडणूक झाली तर देश कोणाच्या बाजूने असणार हे जाणण्याचा प्रयत्न सर्व्हेच्या माध्यमातून केला. या पाहणीनुसार, भाजप प्रणीत एनडीए सरकारच्या कामकाजावर देशातील जनता समाधानी आहे. परंतु राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला धक्का देणारी माहिती या पाहणीतून समोर आली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस यांचे टेन्शन वाढणार आहे. भाजपने राज्यात मिशन ४५ चा नारा दिला असताना मूड ऑफ नेशनच्या सर्व्हे त्यांच्यांसाठी धोक्याची घंटा आहे.

पाहणीनुसार, मोदी सरकारच्या एकूण कामगिरीवर देशातील जनता समाधानी आहे. यामुळे एनडीएला पुन्हा २९८ जागांवर विजय मिळवता येणार आहे. युपीएला १५३ तर इतरांना ९२ जागा मिळतील. कोणत्या राज्यात भाजप प्रणीत एनडीएला यश मिळेल, कोणत्या राज्यात काँग्रेस प्रणीत युपीए आघाडी मजबूत असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय असणार परिस्थिती?

हे सुद्धा वाचा

एकीकडे देशातील जनता मोदी यांच्या पाठिशी ठाम दिसत आहे. परंतु राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. राज्यात सहा महिन्यांपुर्वी शिंदे- फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले आहे. परंतु लोकसभेतील ४८ जागांवर भाजप व शिंदे गटाला मोठा फटका बसणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत ४१ जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजपला २३ तर शिवसेनेला १८ जागा होत्या. महाविकास आघाडीला फक्त सहा जागा होत्या. परंतु आता महाविकास आघाडी ३४ जागांवर पोहचणार आहे. या पाहणीमुळे अर्थात शिंदे-फडणवीस यांचे टेन्शन वाढणार आहे.

यूपीएला कोणत्या राज्यात फायदा?

कर्नाटक : १७ जागा (२०१९ मध्ये २ जागा) महाराष्ट्र : ३४ जागा (२०१९ मध्ये ६ जागा) बिहार :२५ जागा (२०१९ मध्ये १ जागा)

एनडीए कोणत्या राज्यात फायदा?

आसाम : १२ जागा (२०१९ मध्ये ९ जागा) तेलंगाना : ६ जागा (२०१९ मध्ये ४ जागा) पश्चिम बंगाल :२० जागा (२०१९ मध्ये १८ जागा) उत्तर प्रदेश : ७० जागा (२०१९ मध्ये ६४ जागा)

त्या १२ खासदारांना धक्का

राज्यात शिवसेनेत दोन गट झाले आहे. त्यातील १२ खासदारांचा गट म्हणजेच शिंदे सेनेचा गट भाजप सोबत आहे. तर उद्धव ठाकरेंचा गट महाविकास आघाडीत आहे. यामुळे या निवडणुकीत या खासदारांना धक्का बसणार की काय? ही चर्चा सुरु झाली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.