लोकसभा उपाध्यक्षपद शिवसेनेने हक्काने मागितलं, भाजपनेही हक्काने नाकारलं!

शिवसेनेने लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी केली आणि ही मागणी आम्ही हक्काने केली असल्याचंही शिवसेनेकडून सांगण्यात आलं. पण भाजपनेही ही ही मागणी हक्काने नाकारल्याचं दिसतंय.

लोकसभा उपाध्यक्षपद शिवसेनेने हक्काने मागितलं, भाजपनेही हक्काने नाकारलं!

नवी दिल्ली : एनडीएतील सर्वात मोठा मित्रपक्ष म्हणून शिवसेनेने भाजपकडे लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी केली आणि ही मागणी आम्ही हक्काने केली असल्याचंही शिवसेनेकडून सांगण्यात आलं. पण भाजपनेही ही ही मागणी हक्काने नाकारल्याचं दिसतंय. कारण, लोकसभा उपाध्यक्षपद ओदिशामधील सत्ताधारी पक्ष बीजेडीला दिलं जाण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष वायएसआर काँग्रेसला लोकसभा उपाध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती. पण जगनमोहन रेड्डी यांना यासाठी नकार दिला. यानंतर हे पद बीजेडीला दिलं जाणार असल्याचं बोललं जातंय. बीजेडीकडून सलग पाच वेळा खासदार असलेले भरत हरी मेहताब यांची लोकसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागू शकते.

एनडीए आणि यूपीएमध्ये नसलेल्या पक्षांमध्ये बीजेडी, वायएसआर काँग्रेस आणि टीआरएस यांचा समावेश आहे. हे तीनही पक्ष कट्टर काँग्रेसविरोधी असल्यामुळे भाजपशी जवळीक आहे. शिवाय बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी आणि टीआरएस प्रमुख के चंद्रशेखर राव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंधही चांगले आहेत. त्यामुळेच भाजपकडून या पक्षांना जवळ आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

शिवसेनेकडून पदाची मागणी

एनडीएमध्ये सर्वात मोठा दुसरा पक्ष असताना शिवसेनेला केवळ एक कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय. यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी होती, तर अनुभवी खासदार भावना गवळी यांची मंत्रिपदी वर्णी न लागल्यामुळे त्यांचीही नाराजी होती. भावना गवळींची नाराजी दूर करण्यासाठीच लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण भाजपने हे मागणी फेटाळली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *