पाच मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली, मोठी दुर्घटना, दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात मंगळवारी (24 जानेवारी) मोठी दुर्घटना घडली. एक पाच मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली (Lucknow Building Collapse). या प्रकरणी आता पोलिसांकडून सखोल चौकशी केली जातेय.

पाच मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली, मोठी दुर्घटना, दोघांचा मृत्यू, अनेक जखमी
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 5:35 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात मंगळवारी (24 जानेवारी) मोठी दुर्घटना घडली. एक पाच मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली (Lucknow Building Collapse). या दुर्घटनेत सपा नेते अब्बास हैदर यांच्या आई आणि पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखालून 16 पेक्षा जास्त जखमींना बाहेर काढण्यात यश आलंय. बचाव पथकाकडून अजूनही बचाव कार्य सुरु आहे. संबंधित घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. सुरुवातीला ही इमारत भूकंपाच्या धक्क्याने कोसळल्याचा दावा केला जात होता. पण नंतर महत्त्वाची माहिती समोर आली. इमारतीच्या निकृष्ठ बांधकामामुळे ही इमारत कोसळल्याचा आरोप केला जातोय. संबंधित घटना ही हजरतगंज येथील वजीर हसन रोडवर घडली.

वजीर हसन रोडवर उभी असलेली पाच मजली अलया अपार्टमेंट अचानक जमिनीवर कोसळली. संबंधित घटना घडली तेव्हा परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाकडून तातडीने ढिगारे बाजूला सारुन जखमींना वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. पण पाच मजली इमारत कोसळल्याने बचाव पथकापुढील आव्हानंदेखील मोठी होती.

इमारत बांधणाऱ्या बिल्डरवर गंभीर आरोप

दरम्यान, या घटनेनंतर आता संबंधित इमारतीचं बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली होती. संबंधित बिल्डरर्सनी इमारतीच्या बांधकामासाठी निकृष्ठ दर्जाचं साहित्य वापरल्याचा आरोप करण्यात आलाय.

संबंधित इमारतीच्या बांधकामाबद्दल योग्य परवानग्या न घेता ती इमारत बांधण्यात आली होती. पैसे कमवण्यासाठी विकासकांनी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयोग केला. लोकांचा विश्वासघात केला. विशेष म्हणजे फक्त 9 इंचच्या पिलरवर तब्बल 5 मजली इमारत बांधली, असा आरोप करण्यात येतोय.

विशेष म्हणजे इमारतीच्या तळाखाली अनधिकृतपणे लग्नाचा हॉल बांधण्याची योजना बिल्डरची होती. इमारतीच्या विकासकांचं नाव याजदान बिल्डर असं आहे. मालिक सायम आणि फहद यजदानी हे याजदान बिल्डरचे मालक आहेत. या बिल्डर्सच्या ग्रुपमध्ये अलीम चौधरी, सराफत अली हे डायरेक्टर आहेत.

पोलिसांकडून सखोल चौकशी

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कलम 308, 323, 420, 120 B आणि 7 CLA अंतर्गत नवाजिश साडिद, मोहम्मद तारिक आणि फहद याजदानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. मोठी यंत्रणाच आता या प्रकरणाच्या तपासासाठी कामाला लागली आहे. पोलीस या प्रकरणी आणखी काय कारवाई करतात, या प्रकरणी दोषी ठरणाऱ्यांना काही शिक्षा होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.