पोटनिवडणुकीतील पराभवानंतर मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाचे संकेत, कमलनाथांना प्रदेशाध्यक्षपद किंवा विरोधी पक्षनेतेपद सोडावं लागणार?

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत काँग्रेस मोठा विजय मिळवून सत्तेत परतेल असा विश्वास कमलनाथ यांनी व्यक्त केला होता. पण 28 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत 19 जागा जिंकत भाजपनं आपली सत्ता राखली. तर काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

पोटनिवडणुकीतील पराभवानंतर मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाचे संकेत, कमलनाथांना प्रदेशाध्यक्षपद किंवा विरोधी पक्षनेतेपद सोडावं लागणार?
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 2:32 PM

भोपाळ: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाचे संकेत पाहायला मिळत आहे. इतकच नाही तर माजी मुख्यमंत्री कमलनाथ प्रदेशाध्यक्षपद किंवा विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसोबत पार पडलेल्या मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रतिष्ठेची केलेल्या पोटनिवडणुकीत भाजप आपली सत्ता राखण्यात यश मिळालं आहे. (Indications of a major change within the party after the defeat of the Congress in the Madhya Pradesh by-elections)

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी काही काँग्रेस आमदारही भाजपात दाखल झाले होते. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसला सत्तेपासून दूर व्हावं लागलं होतं. या पोटनिवडणुकीत काँग्रेस मोठा विजय मिळवून सत्तेत परतेल असा विश्वास कमलनाथ यांनी व्यक्त केला होता. पण 28 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत 19 जागा जिंकत भाजपनं आपली सत्ता राखली. तर काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यात कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्षपद किंवा विरोधी पक्षनेतेपद सोडावं लागण्याची शक्यता आहे.

पक्षांतर्गत बदलाच्या चर्चेला वेग

पोटनिवडणुकीत ज्या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला त्या जिल्ह्यातील अध्यक्षांसह अनेकांना पद सोडावं लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संघटनेतील मोठ्या नेत्यांनाही पद सोडावं लागण्याची चर्चा सुरु झाली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांना पदावर कायम राहण्यास सांगण्यात आलं होतं. आता पक्ष नेतृत्व कमलनाथ यांच्याकडून त्यांच्या सहमतीनं प्रदेशाध्यक्षपद किंवा विरोधी पक्षनेतेपद काढण्याची शक्यता आहे.

प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी?

काँग्रेस प्रदेशाध्यपदासाठी काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव, माजी मंत्री उमंग सिंगार, कमलेश्वर पटेल, अजय सिंह, जितू पटवारी, मिनाक्षी नटराजन यांच्या नावाचा समावेश आहे. कमलनाथ यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडलं तर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला हे पद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या:

कमलनाथ काँग्रेसचे स्टार प्रचारकच राहणार!, निवडणूक आयोगाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

‘त्या’ वक्तव्यावरुन राहुल गांधींनी कमलनाथांना जाहीरपणे फटकारले, म्हणाले…

Indications of a major change within the party after the defeat of the Congress in the Madhya Pradesh by-elections

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.