तेलंगणात क्रौर्याची परिसीमा, माकडाला गळफास

घराजवळ माकड फिरत असल्याने अम्मापालेम गावातील वेंकटेश्वर राव या नराधमाने माकडाची गळफास लावून हत्या केली (Man caught monkey and hanged him brutally)..

तेलंगणात क्रौर्याची परिसीमा, माकडाला गळफास
Follow us
| Updated on: Jun 29, 2020 | 9:53 AM

हैदराबाद : तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यातील अम्मापालेम गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे (Man caught monkey and hanged him brutally). घराजवळ माकड फिरत असल्याने अम्मापालेम गावातील वेंकटेश्वर राव या नराधमाने माकडाची गळफास लावून हत्या केली. विशेष म्हणजे या क्रूर कृत्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे (Man caught monkey and hanged him brutally).

माकडाची हत्या केल्यानंतर दुसरे काही माकडं त्याठिकाणी आले. तेव्हा गावातील काही लोकांनी आरोपी वेंकटेश्वरला इतर माकडांनादेखील गळफास लावण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याने दुसऱ्या माकडासोबतदेखील तशाचप्रकारचं कृत्य केलं. त्यानंतर वेंकटेश्वरने कुत्र्यांच्या मदतीने माकडांना त्रास दिला. या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, याप्रकरणी वन विभागाने आरोपी वेंकटेश्वरला अटक केली आहे. “आम्ही याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली आहे. जो दोषी असेल, त्याला कडक शिक्षा दिली जाईल”, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशात एकाच ठिकाणी 7 माकडांचे मृतदेह

दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील मालवीय रोडवर सात माकडांचे मृतदेह आढळले. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. सफाई कामगारांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वनविभागाचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं.

वन विभागाने सर्व माकडांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. चौकशीनंतर माकडांच्या मृतदेहाचं कारण समोर येईल, असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, वीज कोसळल्याने माकडांचा मृत्य झाला, असा धावा काही लोकांकडून केला जात आहे. मात्र, अद्याप या दाव्याची पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा : Unlock 2 | ‘अनलॉक 2’मध्ये दोन किमीची ‘लक्ष्मणरेषा’, काय आहेत निर्बंध?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.