बाळाला आशीर्वादासाठी तृतीयपंथींकडून 11 हजारांची मागणी, नकार दिल्याने पित्याची हत्या

घरात बाळ जन्माला आल्यानंतर तृतीयपंथींकडून (Transgender) नवजात बाळाला (New Born Baby) आशीर्वाद देण्याची प्रथा आहे. मात्र यामुळे नुकतंच वडील झालेल्या एका व्यक्तीला जीव गमवावा (Transgender demand money) लागला आहे.

बाळाला आशीर्वादासाठी तृतीयपंथींकडून 11 हजारांची मागणी, नकार दिल्याने पित्याची हत्या

गांधीनगर (गुजरात) : घरात बाळ जन्माला आल्यानंतर तृतीयपंथींकडून (Transgender) नवजात बाळाला (New Born Baby) आशीर्वाद देण्याची प्रथा आहे. मात्र नुकतंच वडील झालेल्या एका व्यक्तीला जीव गमवावा (Transgender demand money) लागला आहे. गहरीलाल खटीक असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुजरातमधील सूरतमध्ये (Gujarat Surat) ही घटना उघडकीस आली आहे.

गहरीलाल खटीक यांचे कुटुंब सूरतच्या गोरदरा परिसरातील मानसरोवर सोसायटीमध्ये राहतात. त्यांना दोन मुली आहेत. खटीक यांच्या पत्नीने गेल्या आठवड्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर ते त्या नवजात बाळाला घेऊन आपल्या राहत्या घरी आले.

त्यानंतर शनिवारी (7 सप्टेंबर) खटीक यांच्या घरी नवजात बाळाला आशीर्वाद देण्यासाठी तृतीयपंथी आले. त्यावेळी तृतीयपंथींनी 11 हजार रुपयांची मागणी (Transgender demand money) केली. मात्र त्यांनी फक्त 2 हजार 100 रुपये दिले. यानंतर तृतीयपंथींनी खटीक यांच्याशी गैरवर्तवणूक केली. त्यांनी खटीक यांचे सर्व कपडे काढले. मात्र घरात उत्साहाचे वातावरण बिघडू नये यासाठी खटीक यांनी शेजाऱ्यांकडून पैसे उधार घेतले.

यानंतर खटीक यांनी त्या तृतीयपंथींना 7 हजार रुपये दिले. मात्र हवी ती रक्कम न मिळाल्याने त्यांनी ते पैसे घेण्यास नकार (Transgender demand money) दिला. त्यानंतर त्यांनी खटीक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कुटुंबातील सदस्य किंवा स्थानिकांनी यात हस्तक्षेप करण्यापूर्वी त्यांनी खटीक यांचे डोकं भिंतीला आपटले. त्यामुळे खटीक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्या ठिकाणावरुन तृतीयपंथींनी पळ काढला.

त्यानतंर खटीक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. दरम्यान खटीक यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *