स्वरा भास्करला सेल्फीसाठी जवळ बोलावलं आणि म्हणाला, "मॅम, आयेगा तो मोदी ही"

नवी दिल्ली : भाजपविरोधात प्रचार करणारी अभिनेत्री स्वरा भास्करचा एक व्हिडीओ व्हायरल केला जातोय. केवळ तीनच सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण या सेकंदाच्या व्हिडीओमध्ये चाहत्याने स्वराला सेल्फी घेण्यासाठी जवळ बोलावलं. स्वरा सेल्फीसाठी जवळ गेली आणि हा चाहता म्हणाला, “मॅम, आयेगा तो मोदी ही”.. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्वराने भाजपविरोधी प्रचार करताना पंतप्रधान …

swara bhaskar selfie, स्वरा भास्करला सेल्फीसाठी जवळ बोलावलं आणि म्हणाला, “मॅम, आयेगा तो मोदी ही”

नवी दिल्ली : भाजपविरोधात प्रचार करणारी अभिनेत्री स्वरा भास्करचा एक व्हिडीओ व्हायरल केला जातोय. केवळ तीनच सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण या सेकंदाच्या व्हिडीओमध्ये चाहत्याने स्वराला सेल्फी घेण्यासाठी जवळ बोलावलं. स्वरा सेल्फीसाठी जवळ गेली आणि हा चाहता म्हणाला, “मॅम, आयेगा तो मोदी ही”.. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

स्वराने भाजपविरोधी प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. या व्हिडीओतून आता तिच्यावर निशाणा साधला जातोय. एका युझरने कमेंट केली, “हा नवा हिंदुस्तान आहे, सेल्फीही घेणार आणि अपमानही करणार”, तर आणखी एका युझरने कमेंट केली, “बिचारीने किती चांगली पोज दिली होती.”

स्वरा भास्करनेही या व्हायरल व्हिडीओवर आता मौन सोडलंय. मोदी भक्तांचा हा चलाखपणा असल्याचं तिने म्हटलंय. त्या व्यक्तीने मला विमानतळावर सेल्फीसाठी बोलावलं. मी सेल्फीसाठी कुणालाच कधीही नकार देत नाही. पण त्याने त्याच वेळेत व्हिडीओ काढला. ही भक्तांची चाल असून माझ्यासाठी नवीन नाही, असं ट्वीट स्वराने केलंय.

भाजपने भोपाळमधून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. दहशतवादातील आरोपीला उमेदवारी दिली म्हणत स्वरा भास्करने भाजपवर टीका केली होती. शिवाय तिने दिल्लीत जाऊन भाजप उमेदवार गौतम गंभीरविरोधात आम आदमी पार्टीच्या उमेदवाराचाही प्रचार केला. यापूर्वी तिने बिहारमध्ये कन्हैय्या कुमारचा प्रचार केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *