कोरोना व्हायरसच्या भीतीनं 50 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

चीनच्या वुहान येथून जगभरात कोरोना व्हायरस पसरला आहे. भारतातही फक्त तीन संशयीत रुग्ण मिळाले असल्याची माहिती (man suicide due to fear of corona virus) आहे.

कोरोना व्हायरसच्या भीतीनं 50 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 12, 2020 | 6:43 PM

हैद्राबाद : चीनच्या वुहान येथून जगभरात कोरोना व्हायरस पसरला आहे. भारतातही फक्त तीन संशयीत रुग्ण मिळाले असल्याची माहिती (man suicide due to fear of corona virus) आहे. पण या व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी (11 फेब्रुवारी) आंध्र प्रदेशमध्ये 50 वर्षीय व्यक्तीने कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या भीतीने आत्महत्या केली. हा आजार आपल्या मुलांना आणि पत्नीला होऊ नये म्हणून या व्यक्तिने हे पाऊल उचलले, असं म्हटलं (man suicide due to fear of corona virus) जात आहे.

मृत व्यक्ती चितूर येथे राहणारा आहे. बाळा कृष्णा असं मृत व्यक्तीचं नाव आहे. कृष्णा यांना ताप आला होता. यादरम्यान त्यांनी कोरोना व्हायरसचा एक व्हिडीओ पाहिला होता. त्यानंतर त्यांना असं वाटू लागले की, त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यावेळी त्यांनी कुटुंबियांना घरात बंद केले आणि आईचे अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी केले तेथे जाऊन कृष्णा यांनी फाशी घेत आत्महत्या केली, असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

यानंतर कृष्णा यांची पत्नी लक्ष्मी देवी यांनी जोरात गोंधळ केला. जेणेकरुन सर्व शेजारी जमा झाले. शेजाऱ्यांनी बाहेरील टाळा तोडून कृष्णाच्या कुटुंबियांना बाहेर काढले. बाहेर आल्यानंतर कृष्णाची शोधाशेध केली असता त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.

“तीरुपती डॉक्टरांनी जेव्हा मृत कृष्णा यांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या शरीरात कोरोना व्हायरस सापडला नाही. त्यांना सामान्य व्हायरल फीवर आला होता. तसेच आंध्रप्रेदशमध्ये एकही कोरोना व्हायरसचा संशयीत रुग्ण समोर आलेला नाही”, असं डॉक्टरांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.