पहाटे 5 वाजून 28 मिनिटांनी महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं. Mdh Owner Mahashay Dharampal Gulati Died From Heart Attack After Corona Recovery
नवी दिल्लीः महाशय दी हट्टी (MDH) चे मालक आणि मसाला किंग म्हणून परिचित असलेले महाशय धर्मपाल गुलाटी (Mahashay Dharampal Gulati) यांचं निधन झालं. वयाच्या 98 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे 5 वाजून 28 मिनिटांनी महाशय धर्मपाल गुलाटी (Mahashay Dharampal Gulati) यांचं निधन झालं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, पण ते त्यातून बरे झाले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्यांचं निधन झालं आहे. (Mdh Owner Mahashay Dharampal Gulati Died From Heart Attack After Corona Recovery)
धर्मपाल गुलाटींचा जन्म 1923 साली पाकिस्तानात झाला होता. एमडीएच मसाल्यांना यशोशिखरावर पोहोचवण्यासाठी धर्मपाल गुलाटी यांनी अपार कष्ट घेतले आहेत. फक्त पाचवीच्या वर्गापर्यंत शिक्षण घेतलेल्या धर्मपाल गुलाटींनी आयुष्यात मोठी उंची गाठली आहे. युरोमोनिटरने सांगितले की, धर्मपाल गुलाटी एफएमसीजी सेक्टरमधील सर्वात जास्त कमाई करणारे सीईओ ठरले आहेत.
सुरुवातीला त्यांनी कुटुंब चालवण्यासाठी टांगाचालक म्हणूनसुद्धा काम केलं होतं. थोडे पैसे जमवल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी लाकडाच्या लहान पेटीतून मसाले विकण्यास सुरुवात केली आणि हा व्यवसाय पुढे वाढवत नेला. सध्या MDH मसाले भारतात सर्वात प्रसिद्ध आहेत.
Mahashay Dharmpal of MDH Spices passes away at 98 pic.twitter.com/Ov8aisY8xr
— ANI (@ANI) December 3, 2020
‘एमडीएच’ची वार्षिक उलाढाल 1500 कोटींच्याही घरात आहे. त्यांच्या कंपनीचे 15 कारखाने असून, 1000 डिलर्सचं जाळं विस्तारलेलं आहे. महाशय धर्मपाल गुलाटींना यांना 2019 मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार धर्मपाल गुलाटी यांना देण्यात आला होता. महाशय धर्मपाल गुलाटी MDH चे मालक होते. अनेकदा त्यांचे फोटो आपण MDHच्या मसाल्यांचा पाकिटावरही पाहायला मिळतात. त्यांच्या वडिलांनी सध्याचं पाकिस्तान पण त्या काळात असलेलं सियालकोट इथे 1919 साली पहिल्यांदा मसाल्यांचा एक छोटा व्यवसाय सुरू केला होता. फाळणीनंतर गुलाटी कुटुंबीय दिल्लीत आले आणि त्यानंतर वडिलांचा छोटा व्यवसाय महाशय धर्मपाल गुलाटी यांनी मोठा करून दाखवला आहे.
Mdh Owner Mahashay Dharampal Gulati Died From Heart Attack After Corona Recovery