गोव्याच्या भाजप सरकारने जे पण केलं, त्यात भ्रष्टाचार होता, मोदीजी लक्ष घाला, सत्यपाल मलिक यांचा गंभीर आरोप

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारविरोधात मोठा गंभीर आरोप केला आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. कोव्हिड काळात तर भ्रष्टाचाराने कळस गाठला, असा गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी लक्ष घालावं, अशी मागणी सत्यपाल मलिक यांनी केली आहे.

गोव्याच्या भाजप सरकारने जे पण केलं, त्यात भ्रष्टाचार होता, मोदीजी लक्ष घाला, सत्यपाल मलिक यांचा गंभीर आरोप
सत्यपाल मलिक
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 10:43 AM

नवी दिल्ली : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारविरोधात मोठा गंभीर आरोप केला आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. कोव्हिड काळात तर भ्रष्टाचाराने कळस गाठला, असा गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी लक्ष घालावं, अशी मागणी सत्यपाल मलिक यांनी केली आहे. आज तकला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी गोवा सरकारविरोधात मोठा आरोप केल. सत्यपाल मलिक याअगोदर गोव्याचे राज्यपालही राहिले आहेत.

मी लोहियावादी, भ्रष्टाचार सहन करू शकत नाही

सत्यपाल मलिक म्हणाले, “गोव्यातील भाजप सरकार कोव्हिड परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळू शकले नाही. मी हे खूप विचारपूर्वक बोलतोय आणि मी माझ्या विधानावर ठाम आहे. गोवा सरकारने जे काही केले त्यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला. गोवा सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मला गोव्याच्या राज्यपालपदावरुन हटविण्यात आलं हकालपट्टी झाली. मी लोहियावादी आहे, चरणसिंग यांच्यासोबत मी काम केलं आहे, मी भ्रष्टाचार सहन करू शकत नाही.”

मोदीजी लक्ष घाला

‘गोवा सरकारची घरोघरी रेशन वाटपाची योजना अव्यवहार्य होती. सरकारला पैसे देणाऱ्या कंपनीच्या सांगण्यावरून हे केले गेले. माझ्याकडे काँग्रेससह इतर पक्षांनी चौकशीशी मागणी केली होती. मी या प्रकरणाची चौकशी करून पंतप्रधानांना माहिती दिली, असंही सत्यपाल मलिक यांनी सांगितलं.

देशातील लोक खरं बोलायला घाबरतात

पुढो बोलताना सत्यपाल मलिक यांनी सांगितलं, ‘ गोवा सरकारने मोठा भ्रष्टाचार केला. पण ते त्यांची चूक कधीही मान्य करणार नाही ही गोष्ट वेगळी… विमानतळाजवळ एक क्षेत्र आहे जेथे खाणकामासाठी ट्रकचा वापर केला जातो. कोविडच्या पार्श्वभूमीवर मी सरकारला ते थांबवण्याची विनंती केली होती, परंतु सरकारने ते मान्य केले नाही आणि नंतर तेथील जागा कोव्हिडचं हॉटस्पॉट बनलं. आज देशातील लोक खरं बोलायला घाबरतात, असंही कथन त्यांनी केलं.

मी खरं बोलायला घाबरत नाही

सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, मला जे वाटते तेच मी बोलतो, मी कुणाला घाबरत नाही. सरकारला सध्याची राज्यपालांची इमारत पाडून नवीन इमारत बांधायची होती, पण त्याची गरज नव्हती. सरकारवर आर्थिक दबाव असताना हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

(Meghalaya Governor Satyapal Singh Corrupation Allegation Against Goa BJP Government)

हे ही वाचा :

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या वतीने रोहतगी बाजू मांडणार, जामीन अर्जावर बॉम्बे हायकोर्टात सुनावणी

Weather: ऐन हिवाळ्यात ढगांचे मळभ का? तळपता सूर्य पुन्हा का गायब झाला? वाचा मराठवाड्यातला हवामानाचा अंदाज

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.