निकालानंतर हिंसाचाराची शक्यता, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी काह तास उरले आहेत. पण देशातील विविध भागात मतमोजणीवेळी हिंसाचार होण्याची माहिती गृहमंत्रालयाला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यातील मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले. पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळीच अनेक ठिकाणी हिंसाचार घडला …

निकालानंतर हिंसाचाराची शक्यता, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी काह तास उरले आहेत. पण देशातील विविध भागात मतमोजणीवेळी हिंसाचार होण्याची माहिती गृहमंत्रालयाला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यातील मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले.

पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळीच अनेक ठिकाणी हिंसाचार घडला होता. त्यामुळे निकालानंतरही हिंसाचाराची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय विरोधक ईव्हीएमविरोधात आक्रमक आहेत. बिहारमधील नेते उपेंद्र कुशवाह यांनी आपल्या बाजूने निकाल न आल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. शिवाय जाहीरपणे हिंसाचार करण्याची धमकीही दिली. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अलर्ट जारी केलाय.

ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घ्या, असे आदेशही देण्यात आले आहेत. स्ट्राँग रुमच्या काळजीबाबतही विशेष सूचना करण्यात आली आहे. विविध नेत्यांनी केलेली वक्तव्ये आणि राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालय सतर्क झालं आहे.

ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्यांना अमित शाहांचं उत्तर

पश्चिम बंगाल वगळता संपूर्ण देशभरात शांततेत निवडणूक पार पडली. 1977 ते 2014 या काळात शांततापूर्ण मार्गाने भारताचा गौरव वाढलाय. पण स्वार्थासाठी विरोधी पक्ष निवडणूक आयोगाची आणि लोकशाहीची प्रतिमा मलीन करत आहेत. या निवडणुकीत जो निकाल येईल तो सर्वांनी मान्य करायलाच हवा, कारण तो देशातील 90 कोटी जनतेने दिलेला निर्णय आहे. जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे, असं अमित शाहांनी म्हटलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *