MIM आमदाराचा हिंदुस्थान बोलण्यास नकार, भाजप आमदाराचा पाकिस्तानात जाण्याचा सल्ला!

MIMचे आमदार अख्तरुल इमान यांनी शपथ ग्रहण करताना हिंदुस्थान शब्दावर आक्षेप घेतला. इमान यांना उर्दू भाषेत शपथ घ्यायची होती. मात्र, उर्दूमध्ये भारताच्या जागेवर हिंदुस्थान शब्दाच्या वापराला त्यांनी आक्षेप व्यक्त केला आणि प्रोटेम स्पीकर यांच्याकडे भारत या शब्दाच्या वापराची मागणी केली.

MIM आमदाराचा हिंदुस्थान बोलण्यास नकार, भाजप आमदाराचा पाकिस्तानात जाण्याचा सल्ला!
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 2:30 PM

पाटणा: 17व्या बिहार विधानसभेच्या पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात झाली. त्यावेळी अनेक आमदारांनी विधानसभेत प्रवेश करताना सदनाच्या पायऱ्यांवर वंदन केल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षाच्या उमेदवारांनी हिंदुस्थान बोलण्यास नकार दिल्यानं जोरदार राडा झाल्याचंही दिसून आलं. MIMचे आमदार भारत बोलण्यावर अडून होते. त्यांना हिंदुस्थान बोलण्यावर आपत्ती होती. MIM आमदाराच्या या व्यवहारावर JDUच्या सदस्यांनीही आक्षेप व्यक्त केला.(MIM MLA refuses to speak Hindustan during swearing-in ceremony in Bihar)

MIMचे आमदार अख्तरुल इमान यांनी शपथ ग्रहण करताना हिंदुस्थान शब्दावर आक्षेप घेतला. इमान यांना उर्दू भाषेत शपथ घ्यायची होती. मात्र, उर्दूमध्ये भारताच्या जागेवर हिंदुस्थान शब्दाच्या वापराला त्यांनी आक्षेप व्यक्त केला आणि प्रोटेम स्पीकर यांच्याकडे भारत या शब्दाच्या वापराची मागणी केली. त्यावर आपण आपत्ती नाही तर तसा सल्ला देत असल्याचं अख्तरुल इमान म्हणाले.

इमान यांनी हिंदुस्थान शब्दाला आक्षेप घेतल्यानंतर विधानसभेत जोरदार राडा सुरु झाला. JDUचे नेते मदन सहनी यांनी आमदारांनी हिंदुस्थान बोललंच पाहिजे असा आग्रह धरला. तर भाजप आमदार नीरज बबलू यांनी हिंदुस्थान बोलण्यास आक्षेप असणाऱ्यांनी पाकिस्तानचा रस्ता धरावा. अशा लोकांना भारतात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. अशा लोकांनी सभागृह सोडून पाकिस्तानात जावं. हे देश तोडणारे लोक आहेत, अशा शब्दात नीरज बबलू यांनी अख्तरुल इमान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

सीमांचलमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या MIM चे 5 उमेदवार विजयी

बिहार विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या MIMने जोरदार प्रदर्शन करत 5 जागांवर विजय मिळवला आहे. सीमांचलमधील कोचाधामन, किशनगंज, अमोर, बहादुरजंग, बैसी, ठाकुरगंज आणि जोकीहाट या विधानसभा मतदारसंघात MIMचे उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.

ओवेसींच्या MIM मुळे महाआघाडीला फटका

ओवेसी यांच्या MIM पक्षाने सीमांचल प्रांतात मजबूत पकड निर्माण केल्याचं काँग्रेसचे आमदार प्रेमचंद्र मिश्रा यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे या क्षेत्रात महाआघाडीला मोठा फटका बसल्याचंही मिश्रा म्हणाले. ओवेसी यांनी कोणत्या तरी खास कारणामुळे महाआघाडीचा गड असलेल्या सीमांचलमध्ये उमेदवार उभे केल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला आहे.

राजदचे प्रवक्ते चित्तरंजन गगन यांनीही ओवेसी यांच्यावर टीका केली आहे. ओवेसींमुळेच महाआघाडीच्या उमेदवारांना फटका बसला. सीमांचलमधील मतांची टक्केवारी पाहिली तर अशी एकही जागा नाही जिथे NDAचा उमेदवार आहे आणि त्या ठिकाणी MIM च्या उमेदवाराला जास्त मतं पडली आहेत, असा आरोप गगन यांनी केला आहे.

ओवैसी आता ममतादीदींना भिडणार

बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने 5 जागा जिंकल्या. या यशामुळे पक्षातील कार्यकर्ते आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा उत्साह वाढल्याचे दिसत आहे. एमआयएम आगामी काळात पश्चिम बंगालच्या निवडणुकाही लढणार असल्याचे संकेत असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारच्या निकालानंतर दिले होते.

“आम्ही पश्चिम बंगालमधील पक्ष कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहोत. आमच्या कित्येक कार्यकर्त्यांना तृणमूल काँग्रेसने तुरुंगात डांबले आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे की नाही ते ठरणार आहोत. उत्तर प्रदेशात आम्ही याआधीही निवडणूक लढवलेली आहे. यानंतरही लढू” अशी माहिती ओवैसींनी याआधी दिली होती.

संबंधित बातम्या:

ओवैसी आता ममतादीदींना भिडणार, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी MIM चा शड्डू

‘MIM संपूर्ण देशात आपला झेंडा फडकावणार’, बिहारमधील कामगिरीनंतर अकबरुद्दीन ओवेसींना विश्वास

Bihar election result 2020: सीमांचलमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या MIM चे 5 उमेदवार विजयी, बिहारमध्ये ओवेसींचं महत्व वाढलं

MIM MLA refuses to speak Hindustan during swearing-in ceremony in Bihar

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.