हा फोटो का व्हायरल होतोय? कारण समजल्यावर तुम्हीही शेअर कराल!

ऐजॉल (मिझोराम): ईशान्येकडील राज्य मिझोराममधील एका चिमुकल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चिमुकल्याचा निरागसपणावर अनेकांनी सोशल मीडियावर भरभरुन लिहिलं आहे. या फोटोच्या व्हायरल होण्यामागील कारण समजल्यावर तुम्हीही कदाचित हा फोटो शेअर कराल. मिझोराममधील  सैरांग इथला हा चिमुकला सायकलवरुन जात होता. मात्र शेजाऱ्याच्या कोंबडीचं पिल्लू त्याच्या सायकलखाली आल्याने जखमी झालं. अनावधानाने झालेला अपघात …

, हा फोटो का व्हायरल होतोय? कारण समजल्यावर तुम्हीही शेअर कराल!

ऐजॉल (मिझोराम): ईशान्येकडील राज्य मिझोराममधील एका चिमुकल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चिमुकल्याचा निरागसपणावर अनेकांनी सोशल मीडियावर भरभरुन लिहिलं आहे. या फोटोच्या व्हायरल होण्यामागील कारण समजल्यावर तुम्हीही कदाचित हा फोटो शेअर कराल.

मिझोराममधील  सैरांग इथला हा चिमुकला सायकलवरुन जात होता. मात्र शेजाऱ्याच्या कोंबडीचं पिल्लू त्याच्या सायकलखाली आल्याने जखमी झालं. अनावधानाने झालेला अपघात त्याच्या जिव्हारी लागला. तो तसाच धावत घरी गेला आणि स्वत:ची पिग्गी बँक तपासली. होते नव्हते ते सगळे पैसे घेऊन तो परत आला. जखमी पिलाला घेऊन तो थेट रुग्णालयात गेला. हा चिमुकला नेमका कोण, जखमी पिलाला घेऊन तो का आलाय, असे प्रश्न रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पडला.

तो चिमुकला डॉक्टरांकडे जाऊन त्या पिलाला वाचवण्यासाठी विनवणी करु लागला. डॉक्टर काका या पिलाला बरं करा, असं सांगू लागला. त्याचवेळी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या निरागस चिमुकल्याचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला.

या चिमुकल्याची निरागसता पाहून अनेकांनी हा फोटो लाईक करुन शेअर केला. आतापर्यंत या फोटोला लाखो लाईक्स आणि शेअर मिळाले आहेत.

चिमुकल्याची निरागसता पाहून अनेकांनी भावनिक कमेंट केल्या आहेत. कोंबडीचं पिल्लू जिवंत आहे की नाही हे कळू शकलं नाही, मात्र या चिमुकल्याने दाखवलेलं प्रसंगावधान, सध्याच्या निष्ठुर होत चाललेल्या जगाला योग्य शिकवण म्हणावी लागेल.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *