गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा दणका, दोन आमदारांसह अल्पेश ठाकोरचा पक्षाला रामराम

अहमदाबाद : युवा नेता अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत काँग्रेसच्या दोन आमदारांनीही पक्षाला रामराम ठोकलाय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गुजरातमध्ये एकदाच तीन धक्के बसले आहेत. अल्पेश ठाकोर 2017 मध्ये झालेल्या गुजरात निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. पण ते ज्या ठाकोर सेनेचे नेते आहेत, त्या संघटनेने त्यांच्यावर पक्ष सोडण्यासाठी …

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा दणका, दोन आमदारांसह अल्पेश ठाकोरचा पक्षाला रामराम

अहमदाबाद : युवा नेता अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत काँग्रेसच्या दोन आमदारांनीही पक्षाला रामराम ठोकलाय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गुजरातमध्ये एकदाच तीन धक्के बसले आहेत. अल्पेश ठाकोर 2017 मध्ये झालेल्या गुजरात निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. पण ते ज्या ठाकोर सेनेचे नेते आहेत, त्या संघटनेने त्यांच्यावर पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकल्याची माहिती आहे. दरम्यान, आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं अल्पेश ठाकोर यांनी स्पष्ट केलंय.

अल्पेश ठाकोर हे राधानपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्यासोबत आमदार धवलसिंह ठाकोर आणि आमदार भारत ठाकोर यांनीही काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अल्पेश ठाकोर यांना लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. पण त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं नाही. साबरकंठा मतदारसंघातून ठाकोर सेनेच्या सदस्याला तिकीट द्यावं, अशी त्यांची मागणी होती. पण ठाकोर सेनेकडे काँग्रेसने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा त्याचा आरोप आहे.

2014 च्या निवडणुकीत भाजपने गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजे 25 जागा मिळवल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसनेही गुजरातमध्ये संपूर्ण ताकद लावली आहे. पण एकामागोमाग एक आमदार पक्षाला रामराम ठोकत आहत. यापूर्वी काँग्रेसच्या पाच आमदारांना भाजपात प्रवेश केलाय. पुन्हा एकदा तीन आमदारांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसने लोकसभेपूर्वी आठ आमदार गमावले आहेत.

2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपची दमछाक केली होती. भाजप आमदारांची संख्या 115 वरुन थेट 99 वर आली होती. काँग्रेसने 81 जागा जिंकल्या होत्या. पण यानंतर काँग्रेसला गळती लागली. आता काँग्रेसकडे केवळ 71 आमदार उरले आहेत. 182 सदस्यसंख्या असलेल्या गुजरातमध्ये 2017 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे 61 आमदार होते. त्यापैकी काही आमदारांनीही भाजपात प्रवेश केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *