गडकरींच्या पत्राची दखल, कमिशन मागणाऱ्या खासदार-आमदारांच्या चौकशीचे सीबीआय संचालकांकडून आदेश

राज्यामध्ये रोड विकासाची कामे करत असताना अनेक आमदार आणि खासदार रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागतात. अशी तक्रार कंत्राटदारांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केली आहे.

  • विनोद राठोड, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली
  • Published On - 17:45 PM, 16 Jan 2020

नवी दिल्ली : रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या खासदार आणि आमदारांची सीबीआय चौकशी करु, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. अनेक खासदार आमदार कंत्राटदारांना त्रास देतात. याबाबतच्या अनेक तक्रारी सीबीआयच्या संचालक कार्यालयात येतात. त्यामुळे सीबीआय संचालकला कार्यालयात बोलवून याबाबतची चौकशी करावी, अशी शिफारस गडकरींनी केली (MLA MP Inquire took commission from Road Contractor) आहे. त्यानंतर सीबीआयचे संचालकांनी संबंधित आमदार खासदारचे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रामध्ये रोड विकास करत असताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सडक परिवहन मंत्रालय करत असतो. राज्यामध्ये रोड विकासाची कामे करत असताना अनेक आमदार आणि खासदार रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागतात अशी तक्रार अनेकदा  केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे काही कंत्राटदार ने केली होती.

या पार्श्वभूमीवर कंत्राटदाराला रोडची कामे योग्यरित्या करण्याची मुभा मिळावी यासाठी नितीन गडकरी यांनी सीबीआय संचालकाकडे राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई विभागातील काही आमदार आणि खासदार यांच्या विरोधात चौकशी करण्याची शिफारस केली होती. यात 12 पेक्षा जास्त आमदार आणि 7 पेक्षा जास्त खासदारांची सीबीआय चौकशी होणार (MLA MP Inquire took commission from Road Contractor) आहे.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सीबीआयचे संचालक यांना आपल्या कार्यालयात बोलावून संबंधित कमिशन खोर आमदार आणि खासदार यांची थेट सीबीआय चौकशी करावी, असे शिफारस पत्र दिले होते. यानंतर सीबीआयचे संचालक यांनी आज कमिशन खोर आमदार आणि खासदारावर धाड टाकून चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे अनेक कमीशन खोर आमदार आणि खासदारांना सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान गडकरी यांच्या शिफारसीनंतर सीबीआयच्या संचालकांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. कंत्राटदाराला त्रास देणाऱ्या आमदार खासदाराविरुद्ध चौकशीची आदेश दिले आहेत. यात विदर्भ, मराठवाडा, पुणे, कोकण विभागातील आमदार खासदारांवर लवकरच सीबीआय धाड टाकणार आहे.

रोड कामासाठी अनेक आमदार खासदार कंत्राटदाराला धमकी देऊन कमिशनची मागणी करतात. यामुळे अनेक कंत्राटदार काम अर्धवट सोडून जात असतात. यामुळे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कमिशन खोर आमदार आणि खासदारांच्या विरोधात सीबीआयचे संचालकला ऑफीस मध्ये बोलावून लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सीबीआयचे संचालक यांनी महाराष्ट्रमधील कमिशन खोर आमदार आणि खासदाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. सीबीआय लवकरच महाराष्ट्रातील आमदार आणि खासदारांवर सीबीआय चौकशीची धाड पडणार (MLA MP Inquire took commission from Road Contractor) आहे.