उत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली

आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीतील देशातील काही मोजक्या प्रभावी मुत्सद्द्यांपैकी जसवंत सिंग एक होते, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

उत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली
Follow us
| Updated on: Sep 27, 2020 | 2:42 PM

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जसवंत सिंग यांच्या मुत्सद्दीपणाचे दाखले देत सोशल मीडियावरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. (MNS Chief Raj Thackeray pays tribute on demise of Jaswant Singh)

“पोखरण 2 च्या अणुचाचण्यानंतर अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले, अशा वेळेस जसवंत सिंग यांनी उत्तम मुत्सद्दीपणाचं कौशल्य दाखवत ते निर्बंध उठवायला लावले. आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीतील देशातील काही मोजक्या प्रभावी मुत्सद्द्यांपैकी ते एक. जसवंत सिंग यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन” असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

जसवंत सिंग गेल्या सहा वर्षांपासून कोमामध्ये होते. ते 8 ऑगस्ट 2014 रोजी आपल्या राहत्या घरी पाय घसरुन पडले होते. उपचारादरम्यान ते कोमामध्ये गेले. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. ते कधी कधी डोळे उघडायचे, थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करायचे, असे त्यांचे सुपुत्र मानवेंद्र सिंग यांनी सांगितले होते.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जसवंत सिंग यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून काम केले होते. ते संरक्षण विषयातील तज्ज्ञही होते. ते भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.

जसवंत सिंग यांनी 2014 मधील लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन भाजपला रामराम केला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

“जसवंत सिंग यांनी संपूर्ण देशाची मन लावून सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि त्यानंतर राजकारणात प्रदीर्घ कार्यकाळात. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले. अर्थ, रक्षा आणि परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.” अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

(MNS Chief Raj Thackeray pays tribute on demise of Jaswant Singh)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.