मोदी सरकार इतिहास रचणार, लवकरच पाण्याखालून मेट्रो धावणार

मुंबई : मोदी सरकार 2021 पर्यंत कोलकातामध्ये अंडरवॉटर मेट्रो सुरु करत आहे. ही मेट्रो भारतीय रेल्वेच्या अंतर्गत काम करणार आहे. कोलकाता मेट्रोने देशातील पहिली अशी वाहतूक सेवा आणली आहे जी पाण्याखालून धावणार आहे. देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोलकात्यातील हुगळी नदीच्या खालून धावणार आहे. कोलकातामध्येच सर्वात पहिली मेट्रो सुरु करण्यात आली होती. आता कोलकातामध्ये पहिल्यांदा …

मोदी सरकार इतिहास रचणार, लवकरच पाण्याखालून मेट्रो धावणार

मुंबई : मोदी सरकार 2021 पर्यंत कोलकातामध्ये अंडरवॉटर मेट्रो सुरु करत आहे. ही मेट्रो भारतीय रेल्वेच्या अंतर्गत काम करणार आहे. कोलकाता मेट्रोने देशातील पहिली अशी वाहतूक सेवा आणली आहे जी पाण्याखालून धावणार आहे. देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोलकात्यातील हुगळी नदीच्या खालून धावणार आहे.

कोलकातामध्येच सर्वात पहिली मेट्रो सुरु करण्यात आली होती. आता कोलकातामध्ये पहिल्यांदा पाण्याखालून धावणारी मेट्रो तयार करण्यात येत आहे. ही मेट्रो कोलकात्यातील हुगळी नदी खालून धावणार आहे. त्यासाठी पूर्णपणे तयारी सुरु आहे.

ही ट्रेन चालवण्यासाठी खास बोगदा तयार केला आहे. हा बोगदा 520 मीटर आणि 30 फूट खोल आहे. मेट्रो ही नदीच्या तळापासून 13 मीटर धावेल. प्रत्येक बोगद्याची रुंदी 5.55 मीटर तसेच भींतीची लांबी 275 मीटर आहे.

कोलकाताची ही मेट्रो सॉल्ट सेक्टर 5 वरुन हावडा मैदान यांच्या दरम्यान 16 किलोमीटरचा प्रवास करेल. मेट्रोचा पहिला टप्पा लवकरच सुरु केला जाईल. ज्यामध्ये लोक आपल्या या खास प्रवासाचा अनुभव घेऊ शकतात. विशेष म्हणजे तयार करण्यात आलेला बोगदा पार करण्यासाठी ट्रेनला फक्त 1 मिनिटाचा अवधी लागणार आहे.

या प्रोजेक्टवर 2009 पासून काम सुरु आहे. 2021 पर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. कोलकाता ट्रेनचा दुसरा टप्पा जपानच्या मदतीने पूर्ण केला जाईल. या बोगद्यातून 80 किलोमीटर प्रति तास वेगाने मेट्रो धावणार आहे. या प्रोजेक्टवर 8 हजार 572 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *