एअर कंडिशनर आणि LED बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना फायदा, लाखो नव्या नोकऱ्याही मिळणार

मोदी सरकारने देशातील एअर कंडिशनर (AC) आणि एलईडी (LED) उत्पादनाबाबत मोठा निर्णय घेतलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:25 PM, 7 Apr 2021
एअर कंडिशनर आणि LED बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना फायदा, लाखो नव्या नोकऱ्याही मिळणार

नवी दिल्ली : मोदी सरकारने देशातील एअर कंडिशनर (AC) आणि एलईडी (LED) उत्पादनाबाबत मोठा निर्णय घेतलाय. यानुसार आता देशातच या दोन्ही वस्तूंच्या उत्पादनावर भर दिला जाणार आहे. यासाठी सरकारने या वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना 4500 कोटी रुपयांचा इनसेंटिव्ह दिलाय. या निर्णयामुळे देशात रोजगाराची संख्या वाढेल आणि एसी आणि एलईडी या वस्तू देशाबाहेरन आयातही कराव्या लागणार नाही, अशी भूमिका सरकारने मांडलीय. स्वतः केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली (Modi government scheme on AC and LED under PLI Atmanirbhar Bharat).

सरकारचा नेमका निर्णय काय?

पीयूष गोयल म्हणाले, “या निर्णयामुळे अनेक नव्या नोकऱ्या तयार होतील. त्याशिवाय वीजेच्या किमतीवरही नियंत्रण येईल. या निर्णयामुळे थेट स्वरुपात जवळपास 32 हजार लोकांना रोजगार मिळेल. अप्रत्यक्षरित्या जवळपास 1 लाख लोकांना नोकऱ्या मिळतील, अशी आशा आहे. केंद्र सरकारने व्हाईट गुड्सबाबत हा निर्णय घेतलाय. व्हाईट गुड्स म्हणजेच एअर कंडीशनर, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा दैनंदिन वापराच्या इलेक्ट्रिक वस्तू होय. या वस्तूंच्या उत्पादनासाठी केंद्र सरकारने पीएलआय योजनेची घोषणा केलीय.”

“एक काळ होता जेव्हा भारतात एअर कंडीशनर बनायचे”

“एक काळ होता जेव्हा भारतात एअर कंडीशनर बनायचे. मात्र, हळूहळू या क्षेत्रात परदेशी कंपन्यांनी आपला जम बसवला. आता देशात 70-80 टक्के एअर कंडीशनर परदेशातून आयात करावे लागतात ही परिस्थिती आहे. म्हणूनच सरकारने यासाठी पीएलआय योजनेची घोषणा केलीय. जसजशी देशातील समृद्धी वाढेल तसतशी देशातील या वस्तूंची मागणीही वाढेल. या वस्तूंचा सीएजीआर (Compound Annual Growth Rate) 15-20 टक्के आहे,” असंही गोयल यांनी नमूद केलं.

सरकारची तयारी काय?

पुढील 5 वर्षांमध्ये या वस्तूंचं देशात उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना 1.46 लाख कोटी रुपयांचा इंसेंटिव्ह देण्यात येईल. देशात वस्तूंचं उत्पादन झाल्याने भारताची आयात घटेल. याशिवाय देशात उत्पादन होईल तेव्हा आपोआप रोजगारही वाढतील. तज्ज्ञांनी म्हटलंय, “या योजनेंतर्गत परदेशी कंपन्यांना भारतात प्लँट उभा करण्यासोबतच भारतीय कंपन्यांना प्लँट उभा करण्यासाठी मदत केली जाईल. ही योजना पुढील 5 वर्षांसाठी असणार आहे.”

हेही वाचा :

1 April पासून दूध ते टीव्ही आणि एसीही महागणार, किती बसणार खिशाला कात्री? वाचा सविस्तर

VIDEO : बूट सुकवण्यासाठी प्रवाशाचा जुगाड, थेट विमानातील एसीचा वापर

व्हिडीओ पाहा :

Modi government scheme on AC and LED under PLI Atmanirbhar Bharat