अर्थव्यवस्थेत तेजी आणण्यासाठी मोदी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अर्थव्यवस्थेत पुन्हा तेजी निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मदतीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

अर्थव्यवस्थेत तेजी आणण्यासाठी मोदी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

मुंबई : अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अर्थव्यवस्थेत पुन्हा तेजी निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मदतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. मोदी सरकार ऑटोमोबाईल क्षेत्रासह इतर 4 क्षेत्रांसाठी मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयात आतापर्यंत दोन ते तीन बैठकाही झाल्या असल्याचे सांगितले जात आहे.

ऑटो क्षेत्राशिवाय इतर 4 क्षेत्रात मदत दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई, MSME), रिअल इस्टेट (Real Estate), बँक आणि एनबीएफसीचा समावेश असेल. परदेशी गुंतवणूकदारांसाठी काही अटींमध्ये बदल केले जातील. जेणे करुन त्यांना भारतात गुंतवणूक करणे सोयीचे ठरेल. तसेच फायनन्शिअल मार्टेकसाठीही सरकार पाऊल उचलणार आहे.

सरकार बँक आणि नॉन-बँकिंगवर विशेष लक्ष ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या नॉन-बँकिंग क्षेत्र आर्थिक अडचणीत सापडलं आहे. सरकार या क्षेत्रासाठीही मदतीची घोषणा करु शकते. याशिवाय रिअल इस्टेट, हाऊसिंग क्षेत्रासाठी मोठी पावलं उचलू शकतात, अशी माहिती समोर येत आहे.

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठीही सहज आणि सोप्या पद्धतीने कर्ज मिळावे यासाठी एक विशेष व्यवस्था करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच रोजगार वाढावे याकडे सरकार लक्ष देत आहे.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात वर्षाला 2 कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या श्रीमंतांवरील कर वाढवला होता. त्यामुळे काही उद्योजकांना याचा फटका बसत होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *