मोदी अजिंक्य नाहीत, 2004 ला काय झालं होतं ते विसरु नका : सोनिया गांधी

रायबरेली : United Progressive Alliance (UPA) च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेली (Rae Bareli Lok Sabha Constituency) या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज (nomination from) दाखल केला.  अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2004 च्या लोकसभा निवडणुकीची आठवण करुन दिली. शिवाय मोदी हे अजिंक्य नाहीत, असंही त्या म्हणाल्या. अर्ज भरल्यानंतर …

Rae Bareli Lok Sabha Constituency, मोदी अजिंक्य नाहीत, 2004 ला काय झालं होतं ते विसरु नका : सोनिया गांधी

रायबरेली : United Progressive Alliance (UPA) च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेली (Rae Bareli Lok Sabha Constituency) या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज (nomination from) दाखल केला.  अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2004 च्या लोकसभा निवडणुकीची आठवण करुन दिली. शिवाय मोदी हे अजिंक्य नाहीत, असंही त्या म्हणाल्या.

अर्ज भरल्यानंतर सोनिया गांधींनी मोदींबद्दल प्रश्न विचारण्यात आल्या. त्यावर त्या म्हणाल्या, “मोदी हे बिलकुल अजिंक्य नाहीत, त्यांनी 2004 ची निवडणूक विसरु नये, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पुन्हा येईल, असं सर्वांना वाटत होतं. पण निकालानंतर काँग्रेसचं सरकार आलं.”

उत्तर प्रदेशात अमेठी आणि रायबरेली हे दोन काँग्रेसचे पारंपारिक मतदारसंघ आहेत. बुधवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सोनिया गांधींनीही गुरुवारी अर्ज दाखल केला. 72 वर्षीय सोनिया गांधी या सलग पाचव्यांदा रायबरेलीतून निवडणूक लढत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर यापूर्वी काँग्रेसमध्येच असलेले दिनेश प्रताप सिंह यांचं आव्हान आहे. दिनेश प्रताप सिंह यांनी गेल्या वर्षी भाजपात प्रवेश केला होता.

अमेठी आणि रायबरेलीतून सपा आणि बसपाने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे इथे प्रमुख लढत काँग्रेस आणि भाजप अशीच होईल. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात म्हणजे 6 मे रोजी रायबरेलीसाठी मतदान होईल. सोनिया गांधींनी रायबरेलीतून 2004, 2006 (पोटनिवडणूक), 2009 आणि 2014 मध्येही निवडणूक जिंकली आहे.

संबंधित बातमी : सोनिया गांधींकडे रिलायन्सचे शेअर्स, इटलीत साडे सात कोटींचं घर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *