VIDEO : चंद्राचा आकार कमी होतोय, नासाच्या संशोधनात धक्कादायक बाब उघड

नवी दिल्ली : पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राचा आकार कमी होत असल्याचे नुकतंच एका संशोधनात उघड झालं आहे. नासा या प्रसिद्ध अमेरिकन संस्थेने हे संशोधन केलं आहे. संशोधनात उघड झालेल्या माहितीनुसार, करोडो वर्षांपासून चंद्राचा आकार 150 फुट म्हणजेच 50 मीटरपर्यंत कमी झाला आहे. नुकतंच नासाच्या लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटरने चंद्राचे 12000 फोटो काढले आहेत. हे सर्व फोटो …

VIDEO : चंद्राचा आकार कमी होतोय, नासाच्या संशोधनात धक्कादायक बाब उघड

नवी दिल्ली : पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राचा आकार कमी होत असल्याचे नुकतंच एका संशोधनात उघड झालं आहे. नासा या प्रसिद्ध अमेरिकन संस्थेने हे संशोधन केलं आहे. संशोधनात उघड झालेल्या माहितीनुसार, करोडो वर्षांपासून चंद्राचा आकार 150 फुट म्हणजेच 50 मीटरपर्यंत कमी झाला आहे.

नुकतंच नासाच्या लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटरने चंद्राचे 12000 फोटो काढले आहेत. हे सर्व फोटो संशोधकांनी व्यवस्थित तपासले असता, चंद्रावर सुरकुत्या पडल्या आहेत. तसचं चंद्राच्या पृष्ठभागाचा पापुद्रा नाजूक असल्याने त्यावर सुरकुत्या पडल्या आहेत. सुरकुत्या पडल्याने चंद्राचा आकार दिवसेंदिवस कमी होत असल्याचं संशोधकांना जाणवलं. द्राक्ष वाळल्यावर मनुक्याचे रुप धारण करते, त्याचप्रमाणे चंद्रावर या सुरकुत्या दिसत आहेत. या कारणामुळे चंद्राचा आकार बदलत असल्याचे संशोधकांना प्राथमिक स्तरावर जाणवलं.

तसंच चंद्रावर पृथ्वीवरील भूकंपाप्रमाणे भूकंप होत आहे. या भूंकपामुळे चंद्राचा आकार दिवसेंदिवस कमी होत आहे. यातील अनेक भूकंप हे पाच पेक्षा अधिक रिश्चर स्केलवरचे आहेत. त्यामुळे चंद्राचा आकार कमी होण्यामागचं प्रमुख कारण चंद्रकंप असल्याचं अंदाज संशोधकांकडून व्यक्त केला जात आहे.

Image Credit : NASA

‘या’ कारणामुळे चंद्राचा आकार कमी

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, दिवसेंदिवस कमी उर्जा मिळत असल्याने चंद्र लाखो करोडो वर्षात 150 फूट म्हणजेच 50 मीटरपर्यंत आकाराने कमी झाला आहे.

युनिर्व्हसिटी ऑफ मेरी लँडच्या जमिनी तज्ज्ञ यांनी वर्तवल्या अंदाजानुसार, चंद्रावर दररोज एकतरी चंद्रकंप होतो. यामुळे त्याचा आकार कमी झाला आहे.

याआधीही 1960 आणि 1970 मध्ये चंद्रावर चंद्रकंप होत असल्याचं अंतराळवीरांच्या लक्षात आलं होतं. याबाबत चंद्रावर संशोधन केल्यानंतर ही बाब उघडकीस आली होती.

पृथ्वीपासून चंद्र हा सरासरी 3 लाख 84 हजार किमी अंतरावर आहे. टायडल फोर्सेसमुळे चंद्र दरवर्षी 3.8 सेंटीमीटरने दूर जातो. चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी तो मोठा दिसतो. पृथ्वीपासून दूर जातो त्यावेळी पृथ्वीवरून पाहताना चंद्रबिंब छोटे दिसते. पण, नासाच्या शास्त्रज्ञांनुसार प्रत्यक्षात चंद्राचा आकार ५० मीटरने कमी झाला आहे.  विशेष म्हणजे बुध ग्रहाचा आकारही कमी होत असून, पृथ्वीचा स्वत:भोवती भ्रमण करण्याचा वेगही मंदावतो आहे. नासाने केलेल्या या संशोधनानंतर खगोलशास्त्रात एकच खळबळ उडाली आहे.

पाहा व्हीडिओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *