एका महिन्यात 162 बालकांचा मृत्यू, रुग्णालय प्रशासनावर टीका

कोटानंतर आता बीकानेरमध्येही लहान मुलांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे.

एका महिन्यात 162 बालकांचा मृत्यू, रुग्णालय प्रशासनावर टीका

जयपूर (राजस्थान) : कोटानंतर आता बीकानेरमध्येही लहान मुलांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. बीकानेरच्या पीबीएम शीशू रुग्णालयात वर्ष 2019 च्या डिसेंबर महिन्यात 162 मुलांचा मृत्यू (most new born baby death in bikaner) झाला आहे. हा आकडा कोटाच्या जे. के. रुग्णालयापेक्षाही अधिक आहे. कोटामध्ये मागे 35 दिवसांमध्ये 110 मुलांचा मृत्यू झाला होता. पीबीएम रुग्णालयातील या घटनेने सध्या रुग्णालय प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका (most new born baby death in bikaner) केली जात आहे.

बीकानेरचे पीबीएम रुग्णालय सर्वात मोठे रुग्णालय आहे. डिसेंबरच्या आकड्यानुसार रुग्णालयात प्रत्येकदिवशी पाचपेक्षा अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबर महिन्यात पीबीएम रुग्णालयात 2219 मुलांनी जन्म घेतला. ज्यामध्ये 162 म्हणजे 7.3 टक्के मुलांचा मृत्यू झाला. गेल्या 2019 वर्षात या रुग्णालयात एकूण 1681 मुलांचा मृत्यू झाला आहे.

“सर्वाधिक अशा नवजात बालकांचा मृत्यू होत आहे जे गंभीर अवस्थेत शेजारील गावातून आलेले आहेत. येथे आल्यावर त्यांची परिस्थिती एवढी गंभीर असते की त्यांना वाचवणे कठीण असते. गंभीर आजार असलेल्या मुलांवर रुग्णालयात चांगल्याप्रकारे उपचार करण्याचा डॉक्टर प्रयत्न करतात. पण तरी त्यांचा मृत्यू होतो”, असं सरदार पटेल मेडिकल कॉलेजचे प्रिंसिपल डॉ. एच. एस. कुमार यांनी सांगितले.

एकदिवसापूर्वी बीकानेरचे कलेक्टर कुमार पाल गैतम यांनी पीबीएम रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अनेक अडचणी तसेच रुग्णांना होणारी गैरसोय कलेक्टरांच्या निदर्शनास आली. तेव्हा त्यांनी तेथील डॉक्टरांची कानउघडणी केली.

या रुग्णालयात 220 बेड आहेत. ज्यामध्ये 140 बेड जनरल वॉर्डमध्ये आहेत. तर 72 बेड नियोनेटल इंटेंसिह केअर यूनिट म्हणजे नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी आहेत. तसेच जनरल वॉर्डमधील मुलांसाठी बेडवरील चादर खूप खराब झालेली आहे. तसेच रात्रीच्या थंडीत त्यांना अंगावर घेण्यासाठीही चादर दिलेली नसते. सध्या हे प्रकरण समोर आल्याने रुग्णालय प्रशासन यावर काही प्रतिक्रिया देत नाहीये. तर ते रुग्णालयाची व्यवस्था चांगली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *