मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव, आता राहुल गांधी म्हणतात…

या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलंय. त्यावरून काँग्रेस भाजपवर हल्लाबोल केलाय. काँग्रेस नेते राहुल गांधींनीही या स्टेडियमच्या नामकरणावरून मोदी सरकारवर जोरदार प्रहार केलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:57 PM, 24 Feb 2021
मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव, आता राहुल गांधी म्हणतात...

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आल्यानं जोरदार राजकारण सुरू झालंय. मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केलं. या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलंय. त्यावरून काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केलाय. काँग्रेस नेते राहुल गांधींनीही या मोटेरा स्टेडियमच्या नामकरणावरून मोदी सरकारवर जोरदार प्रहार केलाय.(Motera Stadium is named after Prime Minister Narendra Modi, now called Rahul Gandhi)

खरं किती चांगल्या प्रकारे बाहेर येते: राहुल गांधी

खरं किती चांगल्या प्रकारे बाहेर येते, नरेंद्र मोदी स्टेडियम, अडानी अँड, रिलायन्स अँड, जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली, असं ट्विट करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

मोदीजी लवकरच त्यांच्यासारखे माजी पंतप्रधान होण्याची चिन्हे: भूपेश बघल

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघल यांनीसुद्धा मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. ही भाजपची परंपरा आहे. अटलजी जिवंत होते, तेव्हा अटल चौक हे त्यांच्या नावावर होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदावरून पायउतार झाले आणि छत्तीसगडमध्ये अटल चौक नामकरण करण्यात आले. मोदीजी लवकरच त्यांच्यासारखे माजी पंतप्रधान होण्याची चिन्हे आहेत, अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघल यांनी केलीय.

महानायकाचा अपमान- काँग्रेस

स्टेडियमला पंतप्रधान मोदी यांचं नाव देणं म्हणजे सरदार पटेल यांचा घोर अपमान असल्याचं काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलंय. मोटेरा स्टेडियमवरुन सरदार पटेल यांचं नाव हटवून नरेंद मोदी यांचं नाव देणं हा स्वातंत्र्याच्या महानायकाचा घोर अपमान आहे, असं ट्वीट श्रीनेत यांनी केलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांचा उद्देशून तुमच्या गर्व आणि अहंकाराला कुठेतरी सीमा असेल, असंही म्हटलंय.

हार्दिक पटेल यांचंही टीकास्त्र

‘सरदार पटेल यांच्या नावानं मतं मागणारी भाजप आता पटेल यांचा अपमान करत आहे. गुजराजची जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही. बाहेरून मित्रता आणि आतून वैर, सरदार पटेल यांच्याबाबत भाजपचा असा व्यवहार राहिला आहे’, अशी टीका गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केली आहे.

इतर बातम्या : 

एक मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस, जावडेकरांची घोषणा

‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेत महाराष्ट्र अव्वल, पुणे आणि अहमदनगरने पहिला क्रमांक पटकावला

Motera Stadium is named after Prime Minister Narendra Modi, now called Rahul Gandhi