VIDEO : मुस्लीम महिलेने भाजपचे सदस्यत्व घेतल्याने घरातून बाहेर काढले

भाजपाचे सदस्यत्व घेतल्यामुळे एका मुस्लिम महिलेला आपले घर खाली करावे लागले आहे. शनिवारी (6 जुलै) महिलेने उत्तर प्रदेशमध्ये सुरु असलेल्या भाजपच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमात जाऊन सदस्यत्व घेतले.

VIDEO : मुस्लीम महिलेने भाजपचे सदस्यत्व घेतल्याने घरातून बाहेर काढले
Follow us
| Updated on: Jul 08, 2019 | 9:36 AM

लखनऊ : भाजपाचे सदस्यत्व घेतल्यामुळे एका मुस्लिम महिलेला आपले घर खाली करावे लागले आहे. शनिवारी (6 जुलै) महिलेने उत्तर प्रदेशमध्ये सुरु असलेल्या भाजपच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमात जाऊन सदस्यत्व घेतले. यामुळे घर मालकाने मला घर खाली करायला सांगितले, असा आरोप या महिलेने घर मालकावर केला आहे. गुलिस्ताना असं या महिलेचं नाव आहे.

तक्रारदार महिलेने देहलीगेट पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार केली आहे. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ही घटना अलीगड येथील शाहजमाल एडीए कॉलनीतील आहे. येथे राहणाऱ्या गुलिस्तानाने भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानातून पक्षाचे सदस्यत्व स्विकारले.

भाजप महिला मोर्चा मंत्री रुबी आसिफ खानसोबत तक्रारदार गुलिस्ताना रघुनाथ पॅलेसमध्ये भाजपच्या कार्यक्रमात गेल्या होत्या. तिथे मिस कॉलच्या माध्यमातून त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्विकारले. कार्यक्रमातील फोटो रविवारी (7 जुलै) वृत्तपत्रात प्रकाशित झाला. गुलिस्तानला फोटोमध्ये पाहून घरमालक वैतागला आणि त्याने तिला घर खाली करण्यास सांगितले.

घर मालकाने अपशब्द वापरत महिलेला लवकरात लवकर घर खाली करण्यास सांगितले. घर मालक सुल्तान आणि त्याची पत्नी मदीना भाजपचे सदस्यत्व घेतल्यामुळे दोघांनीही तिला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.